गारपिटीचा तडाखा : अकोला जिल्हय़ातील २७३९ शेतकरी मदतीसाठी पात्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 02:50 AM2018-02-20T02:50:40+5:302018-02-20T02:58:42+5:30
अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, पीक नुकसानाचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सातपैकी पाच तालुक्यतिं १ हजार ८५७ हेक्टर २0 आर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाईच्या मदतीसाठी गारपीटग्रस्त २ हजार ७३९ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत.
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, पीक नुकसानाचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सातपैकी पाच तालुक्यतिं १ हजार ८५७ हेक्टर २0 आर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाईच्या मदतीसाठी गारपीटग्रस्त २ हजार ७३९ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत.
गत ११ फेब्रुवारी रोजी जिल्हय़ातील सातही तालुक्यांत अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस व गारपिटीने विविध गावांत हरभरा, गहू या रब्बी पिकांसह संत्रा, लिंबू, केळी ही फळपिके आणि कांदा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाल्याने हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीने हिसकावला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला.
अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनामार्फत देण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करून १७ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांसह सातही तहसीलदारांना दिला होता. त्यानुषंगाने तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीने झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात आले असून, पीक नुकसानाचे अहवाल तहसीलदारांमार्फत १९ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, पातूर व तेल्हारा या पाच तालुक्यांमध्ये २ हजार ७३९ शेतकर्यांचे १ हजार ८५७ हेक्टर २0 आर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामध्ये हरभरा, गहू, संत्रा, लिंबू, केळी ही फळपिके आणि कांदा व इतर भाजीपाला पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेले गारपीटग्रस्त शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत.
शासनाकडे आज अहवाल पाठविणार !
अवकाळी पावसासह गारपिटीने जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामध्ये गारपीटग्रस्त शेतकरी आणि ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसानाचे क्षेत्र इत्यादी माहितीचा समावेश आहे.
दोन तालुक्यांत नुकसानच नाही!
अवकाळी पाऊस व गारपिटीने ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला. त्यामध्ये जिल्ह्यातील बाश्रीटाकळी व मूर्तिजापूर या दोन तालुक्यांत ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसान निरंक दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांत पिकांचे नुकसानच नाही. तसेच तेल्हारा तालुक्यात केवळ एका शेतकर्यांचे पीक नुकसान झाले आहे.