क्रीडा संकुलाच्या जागेवर अवैध वीटभट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:33 AM2017-11-22T01:33:04+5:302017-11-22T01:37:50+5:30
बाळापुरातील दुर्लक्षित क्रीडा संकुलाच्या नियोजित जागेवर वीट उत्पादकाने अवैध वीटभट्टी सुरू केल्याचे लोकमतने २१ नोव्हेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. विशेष म्हणजे कुठलाही परवाना नसताना सुरूअसलेल्या या वीटभट्टीवर महसूल विभागाने आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही.
अनंत वानखडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर: बाळापुरातील दुर्लक्षित क्रीडा संकुलाच्या नियोजित जागेवर वीट उत्पादकाने अवैध वीटभट्टी सुरू केल्याचे लोकमतने २१ नोव्हेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. विशेष म्हणजे कुठलाही परवाना नसताना सुरूअसलेल्या या वीटभट्टीवर महसूल विभागाने आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही.
शहरात क्रीडा संकुल व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेच्या बाजूची बाभुळखेड शेत शिवारातील सर्व्हे नं. ८४ मधील १ हेक्टर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. जागा सरळ करण्यासाठी नगर परिषदेने लाखो रुपये खर्च केले. ही जागा तालुका क्रीडा संकुलासाठी नगर विकास आराखड्यात मंजूर आहे. ही जागा मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडून ५१ हजार रुपये मोजणी फी भरून मोजणी झाली. क्रीडा संकुलाचे काम गेल्या १५ वर्षांपासून रखडले आहे. याचा गैरफायदा वीट उत्पादकाने घेऊन तेथे अवैध वीना परवानगी वीटभट्टी सुरू केली आहे.
या भट्टीपासून ३0 मीटर अंतरावर जि.प. माध्यमिक शाळा आहे. तर ७0 मीटर अंतरावर इंदूर-हैद्राबाद महामार्ग आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिनियम १९८१ च्या कलम ५४ मध्ये महामार्गापासून २00 मीटर अंतर, तर मानवी वस्तीपासून २00 मीटरच्या वरच वीटभट्टय़ा असाव्यात. या नियमानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एकाही वीटभट्टीवर कुठलीही कारवाई नाही. उलट शासकीय क्रीडा संकुलाच्या नियोजित जागेत शाळेला व मानवी वस्तीला लागूनच वीटभट्टी सुरू असल्याने शासकीय नियमांचे धिडवडे उडवले जात असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे.
तालुका क्रीडा संकुलाची सव्हर्ेे नं. ८४ मधील १ हेक्टर जागेची मोजणी झाली; परंतु ताबा नसल्याने वीट उत्पादक खुलेआम अतिक्रमण करून अवैध वीटभट्टी सुरू आहे. क्रीडा अधिकारी केवळ सभेसाठी येतात. क्रीडा संकुल जागेची चर्चा करतात. पुढील कारवाई करू म्हणून सांगत वेळकाढू धोरण अवलंबित आहे. २00३ पासून मंजूर क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध असताना हा प्रश्न निकाली निघत नाही, उलट या जागेवर अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण वाढत आहे. मागील १५ वर्षात एकाही लोकप्रतिनिधीने कुठल्या प्रशासकीय अधिकारी, क्रीडा अधिकार्यांनी पुढाकार घेता नाही. शहरात कुठलेही मैदान नसल्याने शहर व ग्रामीण भागातील खेळाडूंना मैदानापासून वंचित ठेवले जात आहे.
संकुलाची नियोजित १ हेक्टर जागेची शासकीय मोजणी झाली. क्रीडा अधिकार्यांना ही जागा ताब्यात घेण्याच्या वेळोवेळी सूचना दिल्या. ताबा पावती झाल्यावर क्रीडा संकुल, क्रीडा अधिकारी यांच्या नावाने ७ /१२ वर नोंद करण्यात येईल. जागेवर अतिक्रमण क ाढण्यासाठी प्रशासकीय अधिकार्यांची समिती स्थापन करण्यात येईल.
-दीपक पुंडे, तहसीलदार, बाळापूर