स्वतंत्र विदर्भ आणि शेतकर्यांच्या प्रश्नांकरिता आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:56 PM2017-11-21T23:56:19+5:302017-11-21T23:59:42+5:30
विदर्भ राज्य व शेतकर्यांचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे या प्रश्नावर आंदोलन म्हणून ११ डिसेंबर ला विदर्भ बंद करिता जय्यत तयारी सुरु असल्याचे माजी आमदार अँड.वामनराव चटप यांनी कार्यकर्त्यांंच्या बैठकीत सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : स्वतंत्र्य विदर्भ राज्य देऊ, शेतकर्यांना संपुर्ण कर्जातून मुक्त करु, शे तमालावर उत्पादन खर्च व ५0 टक्के नफा एवढा हमीभाव देऊन, विजेचे बिल कमी करु, भारनियमन संपवू, शेतकर्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करु अशा प्रकारची आश्वासने व जाहीरनामे दिले. परंतु विदर्भ राज्य व शेतकर्यांचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे या प्रश्नावर आंदोलन म्हणून ११ डिसेंबर ला विदर्भ बंद करिता जय्यत तयारी सुरु असल्याचे माजी आमदार अँड.वामनराव चटप यांनी कार्यकर्त्यांंच्या बैठकीत सांगितले.
अकोट येथे शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक २१ नोव्हेंबर रोजी पार पडली. विदर्भ बंद आंदोलनाच्या दृष्टीने विदर्भाच्या तालुका पातळीवर बैठका घेण्यात येत आहेत. आकोटमध्ये सुध्दा या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे, पश्चिम विदर्भ प्रमुख रंजना तायडे, शेतकरी संघटनेचे ललित बहाळे, सतिष देशमुख, सुरेश जोगले, लक्ष्मीकांत कौठकर, प्रफुल्ल बदरखे, विक्रांत बोंद्रे, रमेश रहाटे, गोपाल निमकर्डे, दिनेश गिर्हे, सुरेश सोनोने, निलेश नेमाडे, अक्षय ओरबारे, प्रकाश बोंद्रे, राजकुमार निमकर्डे, रामकिशोर थुटे, अविनाश गावंडे, दिनेश देऊळकार, मंगेश रेळे यांच्यासह शेतकरी संघटना व विदर्भ राज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विदर्भ बंद मध्ये विदर्भवादी विविध संघटना सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.