अकोला ‘जीएमसी’मधील आंतरवासीता डॉक्टर संपावर

By atul.jaiswal | Published: June 13, 2018 05:00 PM2018-06-13T17:00:41+5:302018-06-13T17:00:41+5:30

असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स (अस्मी)या संघटनेने पुकारलेल्या अनिश्चितकालीन संपामध्ये येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील प्आंतरवासिता डॉक्टर (इंटर्न) सहभागी झाले आहेत.

 Inspector-general of Akola 'GMC' | अकोला ‘जीएमसी’मधील आंतरवासीता डॉक्टर संपावर

अकोला ‘जीएमसी’मधील आंतरवासीता डॉक्टर संपावर

Next
ठळक मुद्देप्रशिक्षणार्थी डॉक्टरांना ११ हजार रुपये विद्यावेतन देण्याच्या २०१५ साली घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची आहे. या डॉक्टरांनी मध्यरात्रीपासून काम थांबवले असून मागण्या पूर्ण होईपर्यंत संप करण्यावर ते ठाम आहेत.नाईलाजाने संपूर्णं महाराष्ट्रतील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना संपावर जावे लागत असल्याचे ‘अस्मी’चे जिÞल्हा प्रतिनिधि डॉ.अंकित तायडे यांनी सांगितले.

अकोला : राज्यातिल सर्व वैद्यकीय व दंत महाविद्यालयातिल आंतरवासिता डॉक्टर (इंटर्न) विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी बुधवार, १३ जूनपासून बेमुदत संपावर गेले आहेत. असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स (अस्मी)या संघटनेने पुकारलेल्या अनिश्चितकालीन संपामध्ये येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील प्आंतरवासिता डॉक्टर (इंटर्न) सहभागी झाले आहेत. मात्र, या संपामुळे रुग्णालयाच्या आरोग्य सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना सध्या सहा हजार रुपये विद्यावेतन मिळते. मात्र प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना ११ हजार रुपये विद्यावेतन देण्याच्या २०१५ साली घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची आहे. या डॉक्टरांनी मध्यरात्रीपासून काम थांबवले असून मागण्या पूर्ण होईपर्यंत संप करण्यावर ते ठाम आहेत.
सध्या उत्तर प्रदेशमध्ये १७ हजार ९०० , कर्नाटकमध्ये १९ हजार ९७५, पश्चिम बंगालमध्ये २१हजार, बिहारमध्ये १५ हजार, छत्तीसगढ, ओरिसा, आसाम आणि केरळमध्ये दरमहा २० हजार रुपये इतके विद्यावेतन दिले जाते. या संदर्भात नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते. एप्रिल २०१८ रोजी याच विषयासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी निदर्शने सुद्धा केली होती. २ मे २०१८ ला वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स (अस्मी)च्या प्रतिनिधींना येत्या १५ दिवसात या विषयावर निकाल लावण्याचे आश्वासन देण्यात आले .तरी मागील ३०-४० दिवसांपासून यावर निर्णय देण्यात आलेला नाही. त्यामुळे नाईलाजाने संपूर्णं महाराष्ट्रतील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना संपावर जावे लागत असल्याचे ‘अस्मी’चे जिÞल्हा प्रतिनिधि डॉ.अंकित तायडे यांनी सांगितले.

रुग्णसेवा ४८ तास; मानधन २०० रुपये प्रतीदिवस
अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर विद्यार्थी व निवासी डॉक्टरांची संख्या पुरेशी नाही. अशा ठिकानी अंतरवासितांना सलग ३६-४८ तास रूग्णसेवा करावी लागते; परंतु शासनाच्या दिरंगाई मूळे १५/०७/२०१५ रोजी आंतरवासितांचे वेतनमान रु.११००० करण्याबाबत निर्णय होउनही अद्यापही आंतरवासीतांना त्यांच्या या सलग रुग्णसेवेचा मोबादला म्हनून मात्र रु.२०० प्रतिदिवस याप्रमाने मानधन देन्यात येत असल्याचे डॉ. अंकित तायडे यांनी सांगितले.

या आहेत मागण्या
१) तातडीने सर्व आंतरवासीता डॉक्टरांचे वेतनमानवाढ करणे.

२) वाढीव वेतनमान फेब्रुवारी २०१८ पासुन लागू करणे.

३) आमच्या कामाचे तास निश्चित करणे.

४) आंतरवासिता डॉक्टर्स च्या संपा मुळे आमच्या आंतरवासितेची मुदत वाढवु नये.

 

Web Title:  Inspector-general of Akola 'GMC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.