जलयुक्त शिवार अभियान पुरस्कार घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 02:24 AM2017-11-04T02:24:26+5:302017-11-04T02:26:22+5:30
अकोला : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. यामध्ये तालुका, गाव व पत्रकार या श्रेणीत पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. यामध्ये तालुका, गाव व पत्रकार या श्रेणीत पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तालुका श्रेणीत अकोला जिल्हय़ातील बाश्रीटाकळी व अकोट तालुक्यांना, बुलडाणा जिल्हय़ातील तालुका श्रेणीत खामगाव व देऊळगाव राजा, तर वाशिम जिल्हय़ातून तालुका श्रेणीत मानोरा व मंगरुळपीर या तालुक्यांना अनुक्रमे पहिल्या व दुसर्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. यातील पुरस्कारप्राप्त गावे, तालुके, पत्रकार यांना ८ नोव्हेंबर रोजी अकोला येथे होणार्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
जिल्हास्तर पुरस्कारप्राप्त तालुके व गावे
अकोला जिल्हा : मोर्हळ, ता. बाश्रीटाकळी (प्रथम), चिखलगाव ता. अकोला (द्वितीय), मोरगाव सादीजन, ता. बाळापूर (तृतीय), विराहित, ता. मूर्तिजापूर (चतुर्थ), नांदखेड, ता. पातूर (पाचवा).
पुरस्कारप्राप्त तालुके -
बाश्रीटाकळी (प्रथम),
अकोट (द्वितीय).
बुलडाणा जिल्हा : येऊलखेड, ता. शेगाव (प्रथम), साखरखेडा, ता. सिंदखेड राजा (द्वितीय), आंबेटाकळी, ता. खामगाव (तृतीय), अटाळी, ता. खामगाव (चतुर्थ), फत्तेपूर, ता. खामगाव (पाचवा).
पुरस्कारप्राप्त तालुके -
खामगाव (प्रथम),
देऊळगाव राजा (द्वितीय).
वाशिम जिल्हा : साखरा, ता. वाशिम (प्रथम), चांधई, ता. मंगरुळपीर (द्वितीय), कोठारी, ता. मंगरुळपीर (तृतीय), एकांबा, ता. मालेगाव (चतुर्थ), नागठाणा, ता. वाशिम (पाचवा).
पुरस्कारप्राप्त तालुके -
मानोरा (प्रथम),
मंगरूळपीर (द्वितीय).
विभागस्तरीय राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार : संजय पाखोडे, जिल्हा अमरावती (प्रथम), राजेश शेगोकार, जिल्हा बुलडाणा (द्वितीय). संदीप शेंडे, जिल्हा अमरावती (तृतीय).
जिल्हास्तरीय पुण्योक अहल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार : अमरावती जिल्हा - संजय बनारसे (प्रथम), संजय रोडे (द्वितीय), हेमंत निखाडे (तृतीय). अकोला जिल्हा - संतोष येलकर (प्रथम), रामराव वानरे (द्वितीय). बुलडाणा जिल्हा - संजय निकस (प्रथम). वाशिम जिल्हा - मोहन राऊत (प्रथम).
पत्रकार श्रेणीतील दोन पुरस्कार ‘लोकमत’ला
पत्रकारांना देण्यात येणार्या पुरस्कारांमध्ये दोन पुरस्कार ‘लोकमत’च्या पत्रकारांना मिळाले आहेत. यामध्ये अमरावती विभागस्तरीय राजमाता जिजाऊ जलमित्र द्वितीय पुरस्कार लोकमतचे मुख्य उपसंपादक राजेश शेगोकार यांना, तर अकोला जिल्हास्तरीय पुण्योक अहल्यादेवी होळकर जलमित्र प्रथम पुरस्कार लोकमतचे उपसंपादक संतोष येलकर यांना जाहीर झाला आहे.