काटेपूर्णा अभयारण्यात लवकरच ‘जंगल सफारी’

By admin | Published: April 18, 2017 01:54 AM2017-04-18T01:54:31+5:302017-04-18T01:54:31+5:30

युद्धपातळीवर वन पर्यटनासाठी विविध कामांची सुरुवात

Kateparana Wildlife Sanctuary will soon be 'Jungle Safari' | काटेपूर्णा अभयारण्यात लवकरच ‘जंगल सफारी’

काटेपूर्णा अभयारण्यात लवकरच ‘जंगल सफारी’

Next

अकोला : काटेपूर्णा अभयारण्य आता वन्यजीवांच्या दर्शनाने पर्यटकांच्या डोळ््यांचे पारणे फेडणार आहे. काटेपूर्णा अभयारण्यात २१ एप्रिलपासून जंगल सफारी सुरू करण्यात येत आहे. आतापर्यंत काटेपूर्णा अभयारण्यात फक्त नेचर ट्रेलच्या माध्यमातून फिरता यायचे; पण नव्याने रुजू झालेले मुख्य वनसंरक्षक व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम.एस. रेड्डी यांनी काटेपूर्णा अभयारण्याचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला असून, युद्धपातळीवर वन पर्यटनासाठी विविध कामांची सुरुवात करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती देताना रेड्डी यांनी सांगितले की, काटेपूर्णा अभयारण्यात इको टुरिझमसाठी खूप मोठा वाव आहे. काटेपूर्णा धरणामुळे येथे वर्षभर इको टुरिझम सुरू राहू शकतो. यामधून या अभयारण्यालगतच्या गावांमध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यामध्ये पहिल्या टप्प्यात अभयारण्यात जंगल सफारीसाठी रस्त्यांची व पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. जवळपास २० किमी अंतराचे नवीन सफारीसाठी रस्ते तयार करण्यात आले आहे. आजपर्यंत काटेपूर्णा अभयारण्यात राहण्याची व्यवस्था नव्हती. तिथे आता राहण्यासाठी कॉटेजसची निर्मिती करण्यात आली आहे.
काटेपूर्णा अभयारण्यात आढळणारे बिबट, अस्वल, मसन्या उद, खवल्या मांजर, चितळ, चौसिंगा, चिंकारा, रान मांजर, तडस, कोल्हा, रानडुक्कर, रानकुत्रे आदी वन्यप्राणी यांच्यासोबतच जवळपास १५० प्रकारचे पक्षी अशी समृद्ध जैवविविधता जगासमोर येणे गरजेचे आहे. काटेपूर्णा अभयारण्यातील वनपर्यटनाला उत्तम सेवा व सुविधा देण्यासाठी वाघा, फेट्रा, धोतरखेडा, रुई, देवदरी या गावातील ग्राम परिसर विकास समितीचे सहकार्य घेण्यात येणार आहे. शेगाव, वाशिम, अमरावती अशा ठिकाणी माहितीचे बोर्ड लावून काटेपूर्णा अभयारण्याची माहिती जनमानसात देण्यात येणार आहे. तसेच गावातील महिलांचे बचत गट तयार करू न त्यांना टी-शर्ट मेकिंग, बांबूपासून विविध वस्तू बनविणे, हॉटेल व्यवस्थापन आदी प्रशिक्षण देऊन त्यांना वनपर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात कासमार गेटवरू न सफारी सुरू करण्यात येणार आहे. ही सफारी कासमार, चाका लपणगृह, रिव्हर व्ह्यु, चिचबन फेट्रा, पांडव लेणी पॉइंट, रिव्हर पॉइंट, चौफुला करू न परत कासमार गेट अशी राहणार आहे. यामधील पाणवठ्यावर वन्य जीवांचे दर्शन सहजरीत्या होऊ शकते. काटेपूर्णातील वन पर्यटन वाढविण्यासाठी उपवनसंरक्षक प्रमोद लाकरा, प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष डांगे, वनरक्षक आर.आर.घुटके, जी.वाय.बेर्डे, व्ही.जी.राऊत, ग्राम परिसर विकास समिती अध्यक्ष मंगेश इंगळे, मंगलदास येवले, अवि देशमुख प्रयत्नशील आहेत.

Web Title: Kateparana Wildlife Sanctuary will soon be 'Jungle Safari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.