आर्द्रता करणार तुरीचा हमीभाव कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:30 AM2017-07-27T03:30:29+5:302017-07-27T03:30:36+5:30

अकोला : टोकन देण्यात आलेल्या शेतकºयांची हमीभावाने तूर खरेदी सुरू करण्यात आली असली, तरी शासन निर्णयानुसार तुरीच्या साठ्यात जास्त आर्द्रता असल्यास तुरीचा हमीभाव कमी करण्यात येणार आहे.

Low humidity will be reduced! | आर्द्रता करणार तुरीचा हमीभाव कमी!

आर्द्रता करणार तुरीचा हमीभाव कमी!

Next
ठळक मुद्देखरेदी रजिस्टरमध्ये केली जाते आर्द्रतेची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : टोकन देण्यात आलेल्या शेतकºयांची हमीभावाने तूर खरेदी सुरू करण्यात आली असली, तरी शासन निर्णयानुसार तुरीच्या साठ्यात जास्त आर्द्रता असल्यास तुरीचा हमीभाव कमी करण्यात येणार आहे. त्यासाठी खरेदी केंद्रांवर तुरीतील आर्द्रतेच्या प्रमाणाची नोंद खरेदी रजिस्टरमध्ये करण्यात येत आहे. पावसाळा सुरू असल्याच्या पृष्ठभूमीवर तूर साठ्यात आर्द्रतेचे वाढते प्रमाण आढळून येत असल्याने, शेतकºयांच्या तुरीला मिळणारा हमीभाव आर्द्रता कमी करणार आहे.
शासन निर्णयानुसार पावसाळा सुरू असल्याच्या पृष्ठभूमीवर तुरीच्या साठ्यात जास्त आर्द्रता असल्यास आर्द्रतेच्या प्रमाणानुसार ग्रेडरच्या सल्ल्याने तुरीचा हमीभाव कमी करण्यात येणार आहे. खरेदी केंद्रांवर तुरीचे मोजमाप करण्यापूर्वी ग्रेडरमार्फत आर्द्रतेच्या प्रमाणाची तपासणी केली जात आहे. त्यामुळे दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तूर खरेदी सुरू करण्यात आली असली, तरी पावसाळा सुरू असल्याने तुरीत आढळून येणारे आर्द्रतेचे वाढते प्रमाण शेतकºयांच्या तुरीला मिळणारा हमीभाव कमी करणार आहे.

आर्द्रता मापक मीटरद्वारे तपासणी!
खरेदी केंद्रांवर ग्रेडरकडून आर्द्रता मापक मीटरद्वारे तूर साठ्यातील आर्द्रतेच्या प्रमाणाची तपासणी केली जात आहे. त्यामध्ये सध्या प्रामुख्याने तूर साठ्यात १२ ते १५ टक्के आर्द्रतेचे प्रमाण आढळून येत आहे. आर्द्रतेच्या प्रमाणाची नोंद तूर खरेदीच्या रजिस्टरमध्ये करण्यात येत आहे.

तूर खरेदीसाठी ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ!
गत २१ जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार, तूर खरेदीची प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला होता; परंतु २६ जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार तूर खरेदीसाठी ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता ३१ आॅगस्टपर्यंत तूर खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

टॅÑक्टरमधील तुरीचे मोजमाप सुरू!
केंद्रांवर मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या टॅÑक्टरमधील तुरीची खरेदी सुरू करण्यात आली. ती पूर्ण झाल्यानंतर टोकन देण्यात आलेल्या आणि शेतकºयांच्या घरी असलेल्या तुरीची खरेदी कागदपत्रांच्या तपासणी नंतर होणार आहे.

Web Title: Low humidity will be reduced!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.