महावितरणचा लाचखोर कार्यकारी अभियंता ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:13 PM2017-09-18T23:13:47+5:302017-09-18T23:17:51+5:30

अकोला : महावितरण कंपनीच्या खासगी कंत्राटदारास पाच  लाख रुपयांच्या कंत्राटासाठी दहा टक्के रक्कम म्हणजेच ५0  हजार रुपयांची लाच मागणार्‍या महावितरण अकोलाग्रामीण  विभागाच्या कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकार याला  अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री  ताब्यात घेतले आहे. दरम्यान उंबरकार याच्या संपत्तीची  चौकशी करण्याची मागणी कंत्राटदारांनी केली आहे.

Mahavitaran's bribe executive engineer is in charge | महावितरणचा लाचखोर कार्यकारी अभियंता ताब्यात

महावितरणचा लाचखोर कार्यकारी अभियंता ताब्यात

Next
ठळक मुद्देअकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईपाच लाख रुपयांच्या कंत्राटासाठी ५0 हजार रुपयांची मागितली लाच अकोलाग्रामीण विभागाचा कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकारला घेतले सोमवारी रात्री ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महावितरण कंपनीच्या खासगी कंत्राटदारास पाच  लाख रुपयांच्या कंत्राटासाठी दहा टक्के रक्कम म्हणजेच ५0  हजार रुपयांची लाच मागणार्‍या महावितरण अकोलाग्रामीण  विभागाच्या कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकार याला  अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री  ताब्यात घेतले आहे. दरम्यान उंबरकार याच्या संपत्तीची  चौकशी करण्याची मागणी कंत्राटदारांनी केली आहे.
महावितरण कंपनीमध्ये ४२ वर्षीय खासगी विदूत  कंत्राटदाराने इलेक्ट्रींक कामाचे पाच लाख रुपयांचे कंत्राट घे तले. या कंत्राटाच्या संपूर्ण रकमेच्या दहा टक्के रक्कम  म्हणजेच ५0 हजार रुपये रक्कम कंत्राटाची वर्कऑर्डर  देण्यासाठी ग्रामीण विभागाचा कार्यकारी अभियंता देवेंद्र सु पडा उंबरकर (३७) याने कंत्राटदारास ८ सप्टेंबर रोजी लाच  मागितली.कंत्राटदाराला ही रक्कम देण्यास मान्य नसल्याने  त्यांनी एसीबीकडे तक्रार  केली. एसीबीचे पोलिस उ पअधीक्षक संजय गोरले यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी  केली. तसेच पंचासमक्ष पडताळणी केली असता लाचखोर  देवेंद्र उंबरकार याने लाच मगिल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर देवेंद्र  उंबरकर याला एसीबीने सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले.  दरम्यान, एसीबी पथकाकडून त्याच्या घराची झाडाझडती  सुरू आहे. एसीबी त्याला रात्री उशिरा अटक करणार आहेत.  ही कारवाई पोलीस निरीक्षक ईश्‍वर चव्हाण, सुनील राऊत,  सैरिसे व कर्मचार्‍यांनी केली. या प्रकरणामध्ये  आणखी काही  अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत का याचा शोध घेण्यात  आहे. त्या सर्वांची चौकशी करण्यात येत असून उंबरकार ला  मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Web Title: Mahavitaran's bribe executive engineer is in charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.