पातूरच्या मुख्याधिकार्यांवर हल्ला करणारा एक जेरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:54 AM2018-02-03T00:54:35+5:302018-02-03T00:54:51+5:30
पातूर : येथील पातूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्यावर बुधवारी सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास हल्ला करणार्या दोनपैकी एका आरोपीस अटक करण्यात पातूर पोलिसांना १ फेब्रुवारी रोजी यश आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : येथील पातूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्यावर बुधवारी सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास हल्ला करणार्या दोनपैकी एका आरोपीस अटक करण्यात पातूर पोलिसांना १ फेब्रुवारी रोजी यश आले आहे.
मिलिंद दारोकार हे बुधवारी सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास डीझल भरण्यासाठी जात असताना पेट्रोल पंप व धाब्याच्या कॉर्नरवर पाळत ठेवून असलेल्या सागर संजय इंगळे रा. नानासाहेब नगर पातूर आणि लखन डागोर रा. विजय नगर अकोला यांनी पातूर तहसीलपासून त्यांचा पाठलाग केला आणि मुख्याधिकारी यांची गाडी अडविली. दारोकार यांना गाडीच्या बाहेर काढून लाथा-बुक्क्या आणि दगडाने मारले. दारोकार यांना मारहाण करून दहशत निर्माण करणार्या या दोघांच्या तोंडाला कापड बांधलेले होते आणि त्यांच्या मोटारसायकलला कोरी नेमप्लेट होती. या घटनेसंदर्भात सायंकाळी उशिरा पातूर पोलिसांत मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांनी तक्रार दिली. त्यानंतर त्यांना पातूर पोलिसांनी उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. याप्रकरणी पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल असून सागर इंगळे याला अटक केली आहे. यातील दुसरा आरोपी लखन डागोर हा अकोल्यातील अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या दोघांना दारोकार यांना मारण्याची सुपारी देण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
काम बंद आंदोलन
पातूर न.प.चे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ १ फेब्रुवारी रोजी सकाळपासून पातूर नगर परिषदेचे कर्मचारी तसेच अखिल भारतीय मजदूर संघटनेच्या कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून व काम बंद आंदोलन केले, तसेच आरोपींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांना पाठविल्या. त्या निवेदनावर नबीखा रहीमखा, दीपक सुरवाडे, गजानन पाटील, प्रमोद घोडे, मो. गाणी उररहमान, विनोद माहुलीकर, ईश्वर पेंढारकर, कल्याणी सोळंके, मोनिका वानखडे, ए. एम. व्यवहारे, मदन खोडे, उज्जवल भरणे, एस. एस. विराणी, शे. यासीन यांच्यासह इतर कर्मचार्यांची स्वाक्षरी आहे.