बहूद्देशीय संस्था हडपली; धर्मादाय आयुक्ताकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:55 AM2017-11-14T01:55:57+5:302017-11-14T02:02:08+5:30

अकोल्यातील सहायक धर्मादाय आयुक्तांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नावाने १९९0 मध्ये नोंदणीकृत असलेल्या संस्था हडपल्याच्या प्रकरणात लोकमतच्या वृत्तानंतर प्रचंड खळबळ माजली. या वृत्ताची दखल घेत सहायक धर्मादाय आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. हा चौकशी अहवाल लवकरच अमरावती येथे सादर करण्यात येणार आहे.

Multipurpose Institution Hudpali; Inquiry by charity commissioner | बहूद्देशीय संस्था हडपली; धर्मादाय आयुक्ताकडून चौकशी

बहूद्देशीय संस्था हडपली; धर्मादाय आयुक्ताकडून चौकशी

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमतच्या वृत्तानंतर खळबळमृत्यू प्रमाणपत्र व स्वाक्षर्‍यांची तपासणी करा

सचिन राऊत । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोल्यातील सहायक धर्मादाय आयुक्तांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नावाने १९९0 मध्ये नोंदणीकृत असलेल्या संस्था हडपल्याच्या प्रकरणात लोकमतच्या वृत्तानंतर प्रचंड खळबळ माजली. या वृत्ताची दखल घेत सहायक धर्मादाय आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. हा चौकशी अहवाल लवकरच अमरावती येथे सादर करण्यात येणार आहे.
 आदर्श कॉलनीतील रहिवासी दामोदर कोंडाजी इंगळे यांनी त्यांच्या १५ सहकार्‍यांसह १९९0 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान रजिस्टर्ड क्रमांक २२५६/एकेएल ही संस्था अकोल्यात सहायक धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत केली होती; मात्र त्यानंतर ही संस्था सोलापूर, सांगली व मुंबई येथील रहिवासी असलेल्या १५ जणांनी अकोल्यातील सभासदांच्या बनावट स्वाक्षरी करून परस्पर ‘चेंज रिपोर्ट’ अकोला धर्मादाय आयुक्तांकडे सादर करून बळकावली. सदर संस्थेचे सोलापूर येथे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सहायक धर्मादाय आयुक्तांनी या संस्थेच्या गांधी नगर व्हीएचबी कॉलनी येथील कार्यालयात नोटीस पाठविल्यानंतर हा प्रकार उघड झाला. संस्था बळकावल्याचे निर्दशनास येताच संस्थापक सभासदांना धक्का बसला. ज्या १५ लोकांनी ही संस्था बळकावली त्यामधील एकही व्यक्ती परिचित नसल्याने संस्थापक सभासदांनी या प्रकरणी सह धर्मादाय आयुक्त अमरावती यांच्याकडे अपील दाखल केले आहे. या अपिलानंतर सोलापूर, सांगली व मुंबईतील सभासदांना उपस्थित राहण्याची नोटीस बजावली; मात्र गत तीन तारखांपासून या तीनही जिल्हय़ातील सभासद उपस्थित राहत नसल्याचे समोर आले आहे. या संस्थेचे मूळ प्रमाणपत्र व दस्तावेज हे अकोल्यातील संस्थापक व संचालकांकडेच असताना हा घोळ घालण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सह धर्मादाय आयुक्त यांच्या आदेशानंतर सहायक धर्मादाय आयुक्त अकोला यांनी सुरू केली असून, त्याचा अहवाल तातडीने अमरावती येथे सादर करण्यात येणार आहे.
 

Web Title: Multipurpose Institution Hudpali; Inquiry by charity commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.