रेशीम उद्योगांसाठी आता मोबाइल अँप
By admin | Published: July 31, 2015 10:49 PM2015-07-31T22:49:26+5:302015-07-31T22:49:26+5:30
तंत्रज्ञानाची जोड दिल्यास योजनेचा शेतक-यांना फायदा.
नीलेश शहाकार/बुलडाणा: राज्यातील रेशीम उद्योग व विकास कार्यक्रमांना चालना व गती देण्यासाठी शासनातर्फे मोबाईल अँप्लीकेशन विकसीत करण्यात येणार आहे. उद्योग व विकास कार्यक्रमांशी जुळलेल्या अधिकारी व कर्मचार्यांनी हे अँप्लीकेशन वापरावे, यासाठी शासनाकडून प्रोत्साहीत केले जाणार असून, त्याचा फायदा रेशीम उद्योगातील शेतकर्यांनाही होणार आहे. पावसाची अनियमिता आणि त्यामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती पाहून, कर्जाखाली दबलेले अनेक शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्विकारत आहे. या दुष्टचक्रातून शेतकर्यांना कायमस्वरुपी मुक्ती मिळवी, म्हणून शेतकर्यांनी रेशीम उद्योगाची कास धरावी, यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. यातूनच रेशीम उद्योगांना नवीन तंत्रज्ञाची जोड देण्यासाठी मोबाईल अँप्लीकेशन तयार करण्याचा निर्णय ३१ जुलै रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला. रेशीम उद्योगांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने ११ कोटी २४ लाख रुपयांच्या निधी जानेवारी २0१५ मध्ये मंजूरी केला होता. यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला होता. *ऑनलाईन छायाचित्र घेवून सेवा व दुरुस्ती सुचविणार रेशीम शेतीचे महत्व लक्षात घेता राज्यातील रेशीम उद्योग प्रकल्पातील तुती बाग, संगोपनगृहाचे योजना अधिकारी, कर्मचारी आिण रेशीम उद्योग शेतकर्यांना या मोबाईल अँप्लीकेशनवर छायचित्र अपलोड करतील. या छायाचित्रांच्या आधारे रेशीम प्रकल्पातील त्रुटी सुचवून ऑनलाईन दुरुस्ती व सेवा शासनाकडून शेतकर्यांना दिली जाईल. यासाठी महाराष्ट्र रिमोट सेंन्सिंग अँप्लीकेशन सेंटर (एमआरएसएसी) या संस्थेमार्फत हे मोबाईल अँप्लीकेशन विकसीत करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने १६.६६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.