निळकंठ सुतगिरणी अध्यक्षपदी रणजित सपकाळ

By admin | Published: February 16, 2016 01:37 AM2016-02-16T01:37:28+5:302016-02-16T01:37:28+5:30

रणधीर सावरकर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड.

Ranjit Sakpal as Nilkantha Sutagiri chairman | निळकंठ सुतगिरणी अध्यक्षपदी रणजित सपकाळ

निळकंठ सुतगिरणी अध्यक्षपदी रणजित सपकाळ

Next

अकोला : निळकंठ सहकारी सुतगिरणीच्या संचालकांची निवड अविरोध झाल्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवडही सोमवारी अविरोध झाली. अध्यक्षपदी डॉ. रणजित सपकाळ तर उपाध्यक्षपदी आमदार रणधीर सावरकर यांची निवड करण्यात आली. निळकंठ सहकारी सुतगिरणीच्या संचालकांची निवड २८ जानेवारी रोजी झाली होती. १७ संचालकांची अविरोध निवड झाली. या संचालकांमधून अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. जिल्हा उपनिंबधक ज्ञानदिप एम. लोणारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड सभेत दुपारी ४ वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी डॉ. रणजित सपकाळ आणि उपाध्यक्षपदासाठी आमदार सावरकर यांच्याशिवाय कुणाचेही अर्ज प्राप्त झाले नाही. त्यामुळे दुपारी ४.३0 वाजता दोन्ही पदाधिकार्‍यांची निवड अविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. अध्यक्षपदासाठी डॉ. सपकाळ यांचे सूचक दामोदर काकड तर अनुमोदक गजानन आखरे होते उपाध्यक्षपदासाठी आ. सावरकर यांचे सूचक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शिरीष धोत्रे आणि अनुमोदक श्रीराम कुकडे होते. या सभेला बाबुराव सपकाळ, विश्‍वासराव ताथोड, डॉ. अनंत भुईभार, किशोर मांगटे, संदीप खारोडे, राजेश राऊत, दिनकर गावंडे, सागर कोरडे, हिदायतउल्ला पटेल,चंद्रकला कळसकर यांची उपस्थिती होती. खासदार संजय धोत्रेसुद्धा निळकंठ सुतगिरणीचे संचालक आहेत. मात्र, आसाम दौर्‍यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

Web Title: Ranjit Sakpal as Nilkantha Sutagiri chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.