रुग्णवाहिकांवर सेवा देणा-या चालकांचे वेतन ६ महिन्यांपासून रखडले

By Admin | Published: December 18, 2014 12:45 AM2014-12-18T00:45:35+5:302014-12-18T01:21:57+5:30

राज्यातील २00 प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील वाहनचालकांची पदे रिक्त; कंत्राटी वाहन चालकाचे मानधन सहा महिन्यांपासून रखडले.

The salary of the service providers on the ambulance has remained for 6 months | रुग्णवाहिकांवर सेवा देणा-या चालकांचे वेतन ६ महिन्यांपासून रखडले

रुग्णवाहिकांवर सेवा देणा-या चालकांचे वेतन ६ महिन्यांपासून रखडले

googlenewsNext

सचिन राऊत/अकोला
प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर असलेल्या जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाच्या रुग्णावाहीकेवर कंत्राटी सेवा देणार्‍या राज्यातील २00 वाहन चालकांचे वेतन गत चार महिन्यांपासून रखडले आहे. हे वाहनचालक तत्पर सेवा देत असतानाही, वेतन रखडल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्यांच्यासाठी कठिण होऊन बसले आहे.
जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमातंर्गत गर्भवती महिला व शिशुंची ग्रामीण भागातून शासकीय रुग्णालयांमध्ये ने आण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर रुग्णवाहीका देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील इतर कामेही या चालकांकडून करून घेतली जातात. गरीब कुटुंबातील रुग्णांना या सेवेचा मोफत लाभ देण्यात येत असून दिवसाला शेकडो रुग्णांची ने-आण या रुग्णवाहीकेमधून करण्यात येते. राज्यातील २00 प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर या वाहनचालकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त जागांवर कंत्राटी वाहन चालकांना कार्यरत असून त्यांना, गत सहा महिन्यापासूनचे वेतनच देण्यात आलेले नाही. या वाहनचालकांना वेतनाअभावी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठिण होत असून, वेतन तातडीने अदा करण्याची मागणी होत आहे. रुग्णवाहिका चालविण्याचे कंत्राट बीव्हीजी कंपनीला देण्यात आले असून, कंपनीकडूनच वेतन देण्यात येत नसल्याचा आरोपही रुग्णवाहीकेच्या चालकांनी केला आहे.

*रुग्णवाहीकांसाठी १0२ हा टोल फ्री क्रमांक आहे. रुग्णाला कुठेही गरज पडल्यास ही रुग्णवाहीका तातडीने हजर होते; मात्र आता वेतन रखडले असल्याने वाहन चालकांची मानसिक स्थिती ढासळत असून त्याचा परिणाम सेवा देण्यावर होत असल्याची माहिती वाहनचालकांनी दिली. कंपनी व शासनाने याचा गांभीर्याने विचार करून रखडलेले वेतन तात्काळ अदा करण्याची मागणी त्यांनी केली. दर महिन्याच्या एक तारखेला वेतन देण्याची मागणी या रुग्णवाहीका चालकांनी केली आहे.

Web Title: The salary of the service providers on the ambulance has remained for 6 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.