विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम मांडणार बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:13 AM2017-09-07T01:13:32+5:302017-09-07T01:13:47+5:30

शहरातील प्रसिद्ध बिल्डर तथा व्यवसायी किशोर खत्री हत्याकांड प्रकरणामध्ये अँड. उज्ज्वल निकम बुधवारी विशेष सरकारी वकील म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर झाले. या हत्याकांड प्रकरणात अँड. निकम ९, १0 व ११ ऑक्टोबर रोजी साक्षीदार तपासणार आहेत. त्यानंतर पुढील सुनावणीस न्यायालयात प्रारंभ होणार आहे. किशोर खत्री यांची ३ नोव्हेंबर २0१५ रोजी सोमठाणा शेत शिवारात गोळय़ा झाडून तसेच धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. 

A special government lawyer will put forth a bright Nikam | विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम मांडणार बाजू

विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम मांडणार बाजू

Next
ठळक मुद्देखत्री हत्याकांड तीन दिवस साक्षीदारांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील प्रसिद्ध बिल्डर तथा व्यवसायी किशोर खत्री हत्याकांड प्रकरणामध्ये अँड. उज्ज्वल निकम बुधवारी विशेष सरकारी वकील म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर झाले. या हत्याकांड प्रकरणात अँड. निकम ९, १0 व ११ ऑक्टोबर रोजी साक्षीदार तपासणार आहेत. त्यानंतर पुढील सुनावणीस न्यायालयात प्रारंभ होणार आहे. किशोर खत्री यांची ३ नोव्हेंबर २0१५ रोजी सोमठाणा शेत शिवारात गोळय़ा झाडून तसेच धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. 
खोलेश्‍वर परिसरात निमार्णधीन असलेल्या बालाजी मॉलच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून खत्री यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली होती.  हत्याकांडाची मािहती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करुन दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले होते. दरम्यान, खत्री हत्याकांडप्रकरणी ६ सप्टेंबर रोजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. जाधव यांच्या न्यायालयात हजर झाले. न्यायालयात पहिल्या टप्प्यातील तीन दिवसांचा साक्षीदार तपासणीचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. आरोपींकडून अमरावती येथील अँड. वसीम मिर्झा, अँड. दिलदार खान, अँड. प्रदीप हातेकर हे कामकाज पाहणार आहेत.

या आरोपींचा समावेश
बिल्डर किशोर हत्याकांडप्रकरणी रणजितसिंह चुंगडे, रुपेश चंदेल, जसवंतसिंह चौहान ऊर्फ जस्सी, राजू मेहरे हे आरोपी आहेत. हत्याकांडानंतर यामधील जस्सी, चुंगडे फरार झाले होते, मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी आरोपी पोलीस कर्मचारी जस्सी ऊर्फ जसवंतसिंह चौहानसह चुंगडे यांची आर्थिक नाकेबंदी केल्यानंतर या आरोपींनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती.

Web Title: A special government lawyer will put forth a bright Nikam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.