एस.टी. कर्मचार्‍यांचा पगारवाढीसाठी संप अटळ

By admin | Published: May 21, 2017 02:00 PM2017-05-21T14:00:54+5:302017-05-21T14:00:54+5:30

सातवा वेतन आयोग पदनिहाय वेतनश्रेणीसह मिळावा, अशी अपेक्षा सर्व एस.टी. कर्मचार्‍यांची आहे.

S.T. Employees are unavoidable for salary hikes | एस.टी. कर्मचार्‍यांचा पगारवाढीसाठी संप अटळ

एस.टी. कर्मचार्‍यांचा पगारवाढीसाठी संप अटळ

Next

अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एस.टी.) महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे पगार अत्यंत कमी आहेत. पगार कमी असल्या कारणाने एस.टी.च्या सर्व कर्मचार्‍यांमध्ये नैराश्य व असंतोषाचे वातावरण पसरले आहे. एस.टी. कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग पदनिहाय वेतनश्रेणीस लागू करू न घेण्यासाठी संप करण्याचा ठराव सांगलीच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता. तसेच कायद्यातील तरतुदींनुसार कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून २६ व २७ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात लेखी स्वरू पात मतदान प्रक्रिया घेण्याचा निर्णय झालेला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हा महाराष्ट्र राज्य सरकारचा अंगीकृत व्यवसाय आहे. यामध्ये काम करणारा कर्मचारी बहुसंख्येने चालक व वाहक या प्रवर्गातीलच आहे. आजच्या महागाईच्या काळात त्यांना तुटपुंज्या सात ते दहा हजार रुपयांमध्ये कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. मार्च २0१६ मध्येच वेतन करार संपुष्टात आल्याने पुढील वेतनवाढ देताना सातवा वेतन आयोग पदनिहाय वेतनश्रेणीसह मिळावा, अशी अपेक्षा सर्व एस.टी. कर्मचार्‍यांची आहे.
अन्यायकारक कनिष्ठ वेतनश्रेणी कायमस्वरू पी रद्द करण्याची मागणीसुद्धा प्रलंबितच आहे. म्हणून संप व संपाआधी मतदान घेण्यासाठी २६ व २७ मे रोजी अकोलासह राज्यभर मतदान प्रक्रियेविषयीची माहिती व सूचना देण्यासाठी अकोला विभागाच्या संपूर्ण पदाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, २१ मे रोजी अकोला आगार क्रमांक २ च्या हनुमान मंदिरात दुपारी ४ वाजता आयोजित केली असल्याची माहिती संघटनेचे विभागीय सचिव अविनाश जहागीरदार, विभागीय अध्यक्ष कैलास नांदूरकर, कार्याध्यक्ष दीपक वैष्णव, कोषाध्यक्ष उदय गंगाखेडकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: S.T. Employees are unavoidable for salary hikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.