स्थायी समिती सभापती, आयुक्तांमध्ये ‘लेटर वॉर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:56 AM2017-10-05T01:56:30+5:302017-10-05T01:56:36+5:30

अकोला: स्थायी समितीमध्ये मंजूर ठराव विलंबाने प्राप्त होत  असल्यामुळे ते वेळेच्या आत पाठविण्याच्या मुद्यावरून महा पालिका आयुक्त अजय लहाने व स्थायी समिती सभापती बाळ  टाले यांच्यात बुधवारी ‘लेटर वॉर’ रंगल्याचे समोर आले. मनपा  आयुक्तांच्या पत्राला सभापती बाळ टाले यांनी प्रत्युत्तर देत  खुलासा सादर करण्याची मागणी केली आहे. 

Standing Committee Chairman, Commissioner 'Letter War' | स्थायी समिती सभापती, आयुक्तांमध्ये ‘लेटर वॉर’

स्थायी समिती सभापती, आयुक्तांमध्ये ‘लेटर वॉर’

Next
ठळक मुद्देमनपा : ठराव वेळेच्या आत पाठविण्यावरून जुंपली

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: स्थायी समितीमध्ये मंजूर ठराव विलंबाने प्राप्त होत  असल्यामुळे ते वेळेच्या आत पाठविण्याच्या मुद्यावरून महा पालिका आयुक्त अजय लहाने व स्थायी समिती सभापती बाळ  टाले यांच्यात बुधवारी ‘लेटर वॉर’ रंगल्याचे समोर आले. मनपा  आयुक्तांच्या पत्राला सभापती बाळ टाले यांनी प्रत्युत्तर देत  खुलासा सादर करण्याची मागणी केली आहे. 
महापालिकेची सर्वसाधारण सभा असो वा स्थायी समितीच्या  सभेमध्ये मंजूर केलेले ठराव प्रशासनाकडे सादर करण्यास  विलंब होतो. सभेचे इतवृत्त लिहिताना काही ठरावांमध्ये आ पसूकच अनावश्यक बाबींचा समावेश केला जातो. सभा सं पल्यानंतर दुसर्‍या दिवशी नगर सचिव इतवृत्ताच्या लिखाणाची  प्रक्रिया पूर्ण करतात. त्यानंतर ठराव तयार करून तो  स्वाक्षरीसाठी महापौर किंवा सभापतींकडे सादर करतात. या  प्रक्रियेदरम्यान किंवा वेळेअभावी काही दिवसांचा अवधी  उलटून जातो; परंतु ठराव वेळेच्या आत प्राप्त झाल्यास त्यावर  अंमलबजावणी करणे सोयीचे होते, या उद्देशातून प्रशासनाकडून  ठरावाची मागणी केली जाते. महापालिका आयुक्त अजय लहाने  यांनी स्थायी समितीच्या ठरावांना दीड महिन्यांचा कालावधी होत  असल्याचे नमूद करीत सभापती बाळ टाले यांना ठराव तीन  दिवसांच्या आत सादर करण्यासंदर्भात पत्र पाठविले. एवढय़ा  विलंबाने ठराव प्राप्त होत असतील, तर पुढील कामकाज कर ताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे यापुढे सभा झाल्यानंतर  तीन दिवसांच्या आत सभेचा ठराव प्रशासनाकडे पाठवावा,  अन्यथा याची गंभीर दखल घेण्यात येईल, असे त्यांनी पत्रात  नमूद केले. अन्यथा गंभीर दखल घेण्यात येईल, म्हणजे नेमके  काय, असा सवाल उपस्थित करीत सभापती बाळ टाले यांनी उ परोक्त वाक्याचा खुलासा चोवीस तासांच्या आत करण्याचे  निर्देश मनपा आयुक्त लहाने यांना पत्राद्वारे दिले आहेत. सभाप तींच्या पत्रावर आयुक्त काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष  लागले आहे. 

सभेच्या ठरावाचे लिखाण करण्याची जबाबदारी नगर सचिवांची  आहे. स्थायी समितीच नव्हे, तर महासभेच्या ठरावांनासुद्धा काही  कारणास्तव विलंब होतो. ठरावाला जाणीवपूर्वक विलंब केला  जात नाही, याची प्रशासनाला जाणीव आहे. असे असताना  आयुक्तांनी कोणत्या उद्देशातून पत्राद्वारे इशारा दिला, याचा त्यांनी  खुलासा करण्याची गरज आहे. 
-बाळ टाले, 
स्थायी समिती सभापती मनपा.

Web Title: Standing Committee Chairman, Commissioner 'Letter War'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.