केळीवेळीत आजपासून राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:06 AM2018-02-08T02:06:16+5:302018-02-08T02:06:36+5:30

केळीवेळी : कबड्डीची पंढरी मानल्या जाणार्‍या केळीवेळी गावात ८ फेब्रुवारीपासून खासदार चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ८ फेब्रुवारीच्या दुपारी ४.३0 वाजता होणार आहे.

Starting of Kabaddi at National level, | केळीवेळीत आजपासून राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेस प्रारंभ

केळीवेळीत आजपासून राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेस प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देस्पर्धेचे उद्घाटन ८ फेब्रुवारीच्या दुपारी ४.३0 वाजता होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
केळीवेळी : कबड्डीची पंढरी मानल्या जाणार्‍या केळीवेळी गावात ८ फेब्रुवारीपासून खासदार चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ८ फेब्रुवारीच्या दुपारी ४.३0 वाजता राज्याचे परिवहन, आरोग्य व राजस्व राज्यमंत्री विजयराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली, राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते पुरुष गटाच्या सामन्यांचे, तर विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सचिव जितू ठाकूर यांच्या हस्ते महिला गटाच्या सामन्यांचे उद्घाटन होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय धोत्रे, आ.बळीराम सिरस्कार, आ.गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, माजी मंत्री रामदास बोडखे, जि.प.अध्यक्ष संध्या वाघोडे, माजी आमदार बबनराव चौधरी, माजी आमदार जगन्नाथ ढोणे, ज्येष्ठ काँग्रेस नेते महेश गणगणे, केळीवेळी ग्राम मंडळाचे अध्यक्ष दिनकरराव गावंडे, ज्येष्ठ नेते प्राचार्य मधुकरराव पवार, प्रसिद्ध उद्योजक श्रीकृष्ण हुसे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश देशमुख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुकुंद खुपसे, अमरावतीचे नगरसेवक बाळासाहेब भुयार, सिटी चॅनेलचे संचालक प्रदीप ऊर्फ बंडू देशमुख, फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य सतीश फडके, पं.स.सदस्य मधुकर पाटकर, जिल्हा क्रीडा अधिकारी कुळकर्णी, ज्येष्ठ सहकार नेते डॉ. रणजित सपकाळ, अकोला कबड्डी असोसिएशनचे सचिव वासुदेवराव नेरकर, राकाँचे ज्येष्ठ नेते दिलीपराव आसरे , अकोला जिल्हा भाजपाचे गणेशराव पोटे व अकोला जिल्हा भाजपाच्या उद्योग सेलचे अध्यक्ष संजय चौधरी उपस्थित राहणार आहेत. 

Web Title: Starting of Kabaddi at National level,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.