पातूर, बाभूळगाव येथे रास्ता रोको
By admin | Published: June 6, 2017 12:42 AM2017-06-06T00:42:45+5:302017-06-06T00:42:45+5:30
पातूर : तालुक्यातील बाभूळगाव येथे आज सकाळी ९ वाजता श्ोतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात चोंढी, आलेगाव, तुलंगा, सस्ती, तांदळी, बाभूळगाव, चरणगाव आदी गावांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : तालुक्यातील बाभूळगाव येथे आज सकाळी ९ वाजता श्ोतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात चोंढी, आलेगाव, तुलंगा, सस्ती, तांदळी, बाभूळगाव, चरणगाव आदी गावांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी भाजपा सरकारवर ताशेरे ओढण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना पीक मालाचा योग्य भाव मिळालाच पाहिजेत, अशा आशयाच्या घोषणासुद्धा यावेळी देण्यात आल्या. आंदोलनामध्ये गोपाल दामोदर गायकवाड, सुरेश प्रल्हाद महानकर, गोपाल फाटकर, वासुदेव विश्वनाथ गावंडे, अरुण वासुदेव फाटकर, राजेश समाधान गवई, गजानन बोमटे, संजय गावंडे, माधव देशमुख, कोल्हे, वसंता भिकाजी कोकणे, विजय फाटकर, विष्णू शिंगणे, राजेश महानकर, मधुकर गावंडे, दुर्योधन धाडसे, दुराम राठोड, लक्ष्मण कासटे, बाळू पाचपोर, संजय गायकवाड आदी सर्व उपस्थित होते.पातूर येथे शिवसेनेतर्फे रास्ता रोको करण्यात आला होता.आंदोलनात शिवसेना तालुकाध्यक्ष रवींद्र मुर्तडकर, गजानन पोफळकर, गजानन गाडगे, मंगेश गाडगे, सागर रामेकर, गोलू, भगवान भराडी, जीवन ढोणे आदी उपस्थिती होती.