कोकेन प्रकरणातील पुरवठादार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:28 AM2017-10-16T02:28:51+5:302017-10-16T02:30:46+5:30

कोकेन जप्ती प्रकरणात अकोल्यातील खरेदीदारांना  कोकेनचा पुरवठा करणारा नायजेरियन इसम जेम्स ऊर्फ लुक  चिक इजियानी या मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व  रामदास पेठ पोलिसांनी मुंबईतून अटक केल्याची माहिती पोलीस  अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत  दिली.

The supplier of cocaine case arrest | कोकेन प्रकरणातील पुरवठादार जेरबंद

कोकेन प्रकरणातील पुरवठादार जेरबंद

Next
ठळक मुद्देपाठलाग करून अटकतीन पोलीस कर्मचारी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोकेन जप्ती प्रकरणात अकोल्यातील खरेदीदारांना  कोकेनचा पुरवठा करणारा नायजेरियन इसम जेम्स ऊर्फ लुक  चिक इजियानी या मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व  रामदास पेठ पोलिसांनी मुंबईतून अटक केल्याची माहिती पोलीस  अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत  दिली. जेम्स व विजय हिरोळे हे दोघेही ट्रांझीट वॉरंटवर  असल्याने त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार  आहे. 
अकोल्यातील बड्या धनदांडग्यांच्या मुलांसाठी आणण्यात येणारे  ४२.१५ ग्रॅम कोकेन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६ ऑ क्टोबर रोजी रेल्वे स्टेशन परिसरातून जप्त केले होते. या  कोकेनची राज्यातील किंमत दोन लाखांच्या घरात असल्याचे  सांगण्यात आले. 
या प्रकरणात रमाबाई आंबेडकरनगरातील रहिवासी विजय ऊर्फ  बाबू चंदू हिरोळे (१९) याला अटक केली होती. हिरोळे हा  मुंबईतील रहिवासी तसेच मूळचा नायजेरिया येथील ‘जेम्स’  ऊर्फ लुक चिक इजियानी रा. मीरा रोड नामक व्यक्तीकडून  कोकेनची खरेदी करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले  होते. रामदास पेठ पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी  जेम्सचा शोध घेत शनिवारी मुंबईतून अटक केली. या प्रकरणात  सिंधी कॅम्पमधील विक्की घनश्यामदास धनवानी आणि रितेश  कन्हैयालाल संतांनी हे दोघे अकोल्यातील कोकेनचे खरेदीदार  असल्याची माहिती आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.  राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत  सागर, शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील, स्थानिक  गुन्हे शाखाप्रमुख कैलास नागरे, रामदास पेठचे ठाणेदार शैलेश  सपकाळ यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आली. पत्रकार  परिषदेला पोलीस उप अधीक्षक राहुल धस, वाहतूक शाखाप्रमु ख विलास पाटील उपस्थित होते.

पोलीस कर्मचार्‍यांनी केला पाठलाग
जेम्सला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने हल्ला करून  पसार झाला. तो पळताच पोलीस कर्मचारी अमित दुबे, राजेश  वानखडे, शक्ती कांबळे आणि राजेश आकोटकर यांनी त्याचा  पाठलाग करून अटक केली. यामध्ये सदर तीनही कर्मचार्‍यांच्या  पायाला गंभीर दुखापत झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यांनी केली कारवाई
पोलीस उपनिरीक्षक रणजितसिंह ठाकूर, राजेश वानखडे, अमित  दुबे, शक्ती कांबळे,  मनोज नागमते, रवी पालीवाल, अजय  नागरे, जितेंद्र हरणे, संजय पाटील, अनिल राठोड, तसेच  रामदास पेठचे संजय आकोटकर, राजपाल ठाकूर, भारसाकळे  व दिनकर धुरंधर यांनी ही कारवाई केली.

Web Title: The supplier of cocaine case arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा