ट्रक— दुचाकी अपघातात तीन जण ठार
By admin | Published: September 15, 2014 02:06 AM2014-09-15T02:06:07+5:302014-09-15T02:06:07+5:30
बाळापूरनजीक भिकुंड नदीच्या पुलावर अपघात
अकोला : ट्रक व मोटारसायलच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर बाळापूरनजीक असलेल्या भिकुंड नदीच्या पुलावर रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.
अकोला शहरातील आकोट फैल भागामधील पिंपळफैल येथील रहिवासी प्रेम चंद्रमनी माने (२0), अभिजित गौतम सावंत (२0), योगेश ऊर्फ गोलू धनराज मानवटर (२0) हे तीन युवक अकोल्यातील एका कॅटरिंगमध्ये कामाला होते. तिघेही कॅटरिंगच्या कामासाठी रविवारी दुपारी एमएच ३0 एएल १२६५ क्रमांकाच्या दुचाकीने पारस फाट्यावरून खामगावकडे निघाले होते. बाळापूरनजिक भिकुंड नदीच्या पुलावर त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणार्या एम एच ३१ बी ५६७५ क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. या अपघातात प्रेम माने, अभिजित सावंत व योगेश मानवटकर या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती बाळापूर पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळ गाठून तिन्ही युवकांना तातडीने सवरेपचार रुग्णालयामध्ये उपचारासाठी रवाना केले; मात्र डॉक्टरांनी तीनही युवकांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच, पिंपळफैल येथील नागरिकांनी सवरेपचार रुग्णालयामध्ये गर्दी केली. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले असून, ट्रकही जप्त करण्यात आला आहे.