मालवाहू ट्रक गेला विद्यार्थीनीच्या हातावरून; खांद्यापासून हात निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 02:46 PM2018-06-27T14:46:46+5:302018-06-27T15:43:06+5:30
मूर्तीजापूर (जि. अकोला) : शाळेतून घरी परत जात असताना एका व्यक्तीचा धक्का लागल्याने सायकलवरून पडलेल्या विद्यार्थीनी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकखाली सापडली.
मूर्तीजापूर (जि. अकोला) : शाळेतून घरी परत जात असताना एका व्यक्तीचा धक्का लागल्याने सायकलवरून पडलेल्या विद्यार्थीनी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकखाली सापडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातातून विद्यार्थीनी वाचली असली, तरी ट्रक हातावरून गेल्याने तीचा संपूर्ण हात निकामी झाला. येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयासमोर बुधवारी सकाळी घडली.
प्रिया गजानन वानखडे (१५) ही बुधवारी सकाळी शाळेतून सायकलद्वारे घरी परत जात होती. लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयासमोर आॅटोरिक्षा मधून उतरणारºया व्यक्तीचा धक्का लागल्याने ती सायकल वरुन खाली पडली. नेमका त्याच वेळी विरुद्ध दिशेने येत असलेला एम.पी.एच.जी. ७०७२ क्रमांकाचा ट्रक प्रियाच्या हातावरून गेला. ट्रक हातावरून गेल्यामुळे प्रियाचा उजवा हात चेंदामेंदा झाला असून, तो खांद्यापासून संपूर्ण निकामी झाला. यावेळी उपस्थित नागरिकांनी प्रियाला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात नेले. त्यानंतर तिला अकोला येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. मुळची कामठा येथील रहिवासी असलेली प्रिया ही सेंट आॅन्स स्कूल मध्ये इयत्ता नववीची विद्यार्थीनी असून, ती शिक्षणासाठी आपल्या मोठ्या वडीलांकडे मूर्तिजापूर येथे राहते. या प्रकरणी ट्रक चालक गणेश गोविंदराव पानसे रा. अचलपूर याला मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. सदर ट्रक मूर्तिजापूर येथील मूलचंद किराणा दुकानचा माल घेऊन आला होता. वृत्त लिहिस्तोवर ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.
नागरिकांनी दिला ठिय्या
मूर्तिजापूर येथील मुख्य रस्त्याचे काम पाच महिन्यांपासून अतिशय संथ गतीने चालू असून, एकेरी वाहतुक सुरु आहे. त्यामुळे हा अपघात झाल्याचे नागरीकांचे म्हणने आहे. संबंधीत जबाबदार अधिकाºयावर व ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी नागरीकांनी घटनास्थळी दोन तास ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणात शहर ठाणेदार यांनी मध्यस्थी करुन आंदोलकांना शांत केले. या अपघाताला संबंधित प्रशासन जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. संजय नाईक, पंडित वाघमारे, रवि राठी, अप्पू तिडके, टाले सर, सुहास सर, अॅड विपीन अग्रवाल, संजय निस्ताने, शिवा गव्हाणे, मनोज जावरकर, संजय झारोडीया, संजय वानखडे, संजय पालीवाल, संजय तिहीले, अंगद ठाकरे, नितीन वर्मा, मनोज वर्मा, अक्षय लकडे, मोहन वसूकार हे आंदोलनात सहभागी होते. (शहर प्रतिनिधी)