चरणगाव येथील विद्यार्थिनीचा अज्ञात तापाने मृत्यू

By admin | Published: October 8, 2014 12:38 AM2014-10-08T00:38:43+5:302014-10-08T00:38:43+5:30

ग्रामीण भागात साथरोगांचा प्रकोप.

An unidentified fever death of a student of Phagwara | चरणगाव येथील विद्यार्थिनीचा अज्ञात तापाने मृत्यू

चरणगाव येथील विद्यार्थिनीचा अज्ञात तापाने मृत्यू

Next

विवरा (पातूर, जि. अकोला): पातूर तालुक्यातील चरणगाव येथील एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी अज्ञात तापाने मृत्यू झाला. आरती रामदास दोडके असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ती विवरा येथील स्व. बेबीताई स. इंगळे उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता १२ वी मध्ये शिकत होती. दोन दिवसांपूर्वी तिला अचानक ताप आला. तापाचे निदान होण्यापूर्वीच मंगळवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या निधनामुळे चरणगाव व विवरा येथील विद्यालया त शोककळा पसरली आहे.

Web Title: An unidentified fever death of a student of Phagwara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.