जागतीक महिला दिनानीमीत्त अकोल्यातील पोलिस ठाण्यांमध्ये महिला पोलिसांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 04:39 PM2018-03-08T16:39:14+5:302018-03-08T16:39:14+5:30
अकोला - जागतीक महिला दिनाचे औचीत्य साधत अकोला जिल्हा पोलिस प्रशासनाव्दारे महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
अकोला - जागतीक महिला दिनाचे औचीत्य साधत अकोला जिल्हा पोलिस प्रशासनाव्दारे महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. शहरातील पोलिस ठाण्यांसह ग्रामिण भागातील पोलिस ठाण्यांमध्येही महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ठाणेदार तसेच पोलिस अधिकाºयांच्या हस्ते गोरव करण्यात आला.
पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर व अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांनी जागतीक महिला दिनानीमीत्त महिला पोलिस कर्मचारी व महिला पोलिस अधिकारी यांचा सन्मान करण्याची संकल्पना पोलिस अधिकाऱ्यांजवळ मांडली. या संकल्पेनुसार जिल्हयातील पोलिस ठाण्यांमध्ये महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुरुवारी सकाळी गौरव करण्यात आला. यामध्ये शहर पोलिस उपअधिक्षक उमेश माने पाटील यांनी हीरीरीने सहभाग घेउन सव महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. शहरातील खदान पोलिस ठाण्यात ठाणेदार संतोष महल्ले यांनी सकाळीच परेड दरम्यान महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देउन गौरव केला, तसेच महिला पोलिसांचे ठाण्यातील योगदान महत्वाचे असल्याचे सांगीतले. स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख कैलास नागरे व वाहतुक शाखा प्रमूख विलास पाटील यांनीही महिला पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा गौरव केला. त्यानंतर सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात ठाणेदार अन्वर शेख यांनी महिला पोलिसांचा सत्कार केला. जुने शहर पोलिस ठाण्यात ठाणेदार गजानन पडघन यांनी, सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात ठाणेदार अनील जुमळे, एमआयडीसी पोलिस ठाण्यात ठाणेदार किशोर शेळके, रामदास पेठ पोलिस ठाण्यात ठाणेदार शैलेष सपकाळ, आकोट फैल पोलिस ठाण्यात संजीव राउत तर डाबकी रोड पोलिस ठाण्यात सुनील सोळंके यांनी महिला पोलिस कर्मचाºयांचा गौरव केला.