शून्य सावलीची अनुभूती गुरुवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:49 PM2019-05-21T12:49:37+5:302019-05-21T12:50:47+5:30

सूर्य जेव्हा पृथ्वीवरील स्थानांचे सरळ पूर्व रेषेत येऊन दुपारी जेव्हा डोक्यावर येईल, तेव्हा आपली सावली आपल्या पायाजवळ आलेली असेल.

Zero shadow sensation on Thursday | शून्य सावलीची अनुभूती गुरुवारी

शून्य सावलीची अनुभूती गुरुवारी

Next

अकोला: सदैव साथ देणारी सावली २३ मे रोजी दुपारी १२ वा. १८ मिनिटांनी नाहीशी होणार आहे. ही खगोलीय घटना आपल्या डोक्यावरच्या आकाशत सूर्य आल्याने घडते. पृथ्वी तिच्या भ्रमण कक्षेशी कलून फिरत असल्यामुळे दररोजचा सूर्योदय हा नेमका एका ठिकाणी न होता, त्याचे स्थान बदलत असते. २१ मार्च व २३ सप्टेंबर या विषुवदिनी सूर्याबरोबर पृथ्वीच्या विषुववृत्तावर उगवल्याने दिवस-रात्र समान असतात.
शून्य सावली दिवसाची अनुभूती कर्कवृत्तापासून मकरवृत्तापर्यंतच घेता येऊ शकते. सूर्य जेव्हा पृथ्वीवरील स्थानांचे सरळ पूर्व रेषेत येऊन दुपारी जेव्हा डोक्यावर येईल, तेव्हा आपली सावली आपल्या पायाजवळ आलेली असेल. सकाळी लांब पडणारी सावली जसाजसा सूर्य आकाशात वरवर येईल, तशीतशी तिची लांबी कमी होत जाते. सर्वात लहान सावली ही वेळ त्या ठिकाणची माध्यान्ह वेळ असेल. हिलाच स्थानिक वेळही म्हणतात. अकोला शहराचे पूर्व रेखांश ७७ अंश २ मी. असून, अक्षांश उत्तर २0 अंश २ मी. एवढे आहे. जनसामान्यांसाठी या गोष्टीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विश्वभारती केंद्राद्वारा फूडपार्क कॉर्नर व अजिंक्य फिटनेस सेंटरच्या सहकार्याने राऊतवाडी भागातील मनपा शाळा क्र. पाचच्या दक्षिणेस दुपारी शून्य सावली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी कळविले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Zero shadow sensation on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.