३६५ दिवसांत ३६० डिग्रीने अर्थव्यवस्थेला वळण, माधव भंडारी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 09:03 PM2017-11-08T21:03:28+5:302017-11-08T21:03:54+5:30

अमरावती : नोटाबंदीच्या फटक्याने देशविरोधी अनेक मुद्दे निकाली निघाल्याने विरोधकांचा तीळपापड झाला आहे.

360-degree turn of events in the 365 days, Madhav Bhandari's information | ३६५ दिवसांत ३६० डिग्रीने अर्थव्यवस्थेला वळण, माधव भंडारी यांची माहिती

३६५ दिवसांत ३६० डिग्रीने अर्थव्यवस्थेला वळण, माधव भंडारी यांची माहिती

Next

अमरावती : नोटाबंदीच्या फटक्याने देशविरोधी अनेक मुद्दे निकाली निघाल्याने विरोधकांचा तीळपापड झाला आहे. भाजपा सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी हजार व पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून हटविल्या. त्याला बुधवारी वर्ष पूर्ण झाले. त्याप्रीत्यर्थ काळा पैसाविरोधी दिवस आम्ही पाळत आहे. त्यानंतरच्या ३६५ दिवसांत देशाच्या अर्थव्यवस्थेला ३६० अंशातून सुधारित वळण मिळाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश प्रवक्ता माधव भंडारी यांनी येथे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेला पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा हटविण्याचा निर्णय देशाला धक्का देऊन गेला. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काही काळ परिणाम होऊन जनतेला त्रास सहन करावा लागला. मात्र, देशात बोकाळलेला भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवादाचा कहर यांच्यावर अंकुश घालण्यास मदत झाली. आयकराचा भरणा मोठ्या प्रमाणात झाला. करदात्यांची संख्या वाढली. देशाच्या तिजोरीत कधी नव्हे एवढा पैसा जमा झाला. आता सर्व स्तरांतून देशाची आर्थिक घडी सुधारत असल्याचे माधव भंडारी म्हणाले. पत्र परिषदेला शिवराय कुलकर्णी, प्रणय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहणकर, चेतन गावंडे, बपोरीकर आदी उपस्थित होते.
२३.८ टक्के कर वसुली
च्मागील ७० वर्षांच्या काळात देशाला केवळ दोन ते अडीच टक्के आयकर प्राप्त होत होता. ४० टक्क्यांवर लोक कर भरतच नव्हते. मात्र, नोटबंदीमुळे बँकांचे व्यवहार पारदर्शक झाल्याने यंदा १९ लाख नवीन करदाते पुढे आले आहेत. त्यामुळे २३.८ टक्के करवसुली झाली. त्यातून भरमसाठ पैसा सरकारच्या तिजोरीत जमा झाला तसेच बँकेत ठेवीस्वरुपात मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला, असे भंडारी म्हणाले.

Web Title: 360-degree turn of events in the 365 days, Madhav Bhandari's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.