३,७७८ उमेदवार अपात्र!; निवडणूक खर्च, जातवैधता प्रमाणपत्र सादर नाही

By admin | Published: February 16, 2016 11:57 PM2016-02-16T23:57:21+5:302016-02-16T23:57:21+5:30

जिल्ह्यात सन २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर करणे ..

3,778 candidates ineligible! Election expenses, caste validity certificate is not present | ३,७७८ उमेदवार अपात्र!; निवडणूक खर्च, जातवैधता प्रमाणपत्र सादर नाही

३,७७८ उमेदवार अपात्र!; निवडणूक खर्च, जातवैधता प्रमाणपत्र सादर नाही

Next

गजानन मोहोड अमरावती
जिल्ह्यात सन २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर करणे व विजयी उमेदवारांनी सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. मात्र, अशा ३ हजार ७७८ उमेदवारांनी सक्षम प्राधिकरणाकडे विहित मुदतीत हे सादर न केल्यामुळे त्यांच्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियमान्वये अपात्रतेची कारवाई होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा, खर्च सादर करण्याचा कालावधी आणि पद्धतीचा वापर केला जातो. आयोगाच्या ७ फेब्रुवारी १९९५ च्या आदेशांनुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा ग्रापंच्या उमेदवारांना पाच वर्षांकरिता अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. ही कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना ५ जून २०१० व १९ नोव्हेंबर २०१० च्या आदेशाप्रमाणे सक्षम अधिकारी म्हणून निवडणूक आयोगाने प्रदान केले आहेत.

प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल
अमरावती : जिल्ह्यात मागील वर्षी ५५४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका व १९६ पोटनिवडणुका पार पडल्यात. यामध्ये १० हजार ८३२ उमेदवारांनी निवडणूक लढविली. यापैकी ८ हजार ७३ उमेदवारांनी निवडणूक खर्च विहित मुदतीत सादर केला. मात्र, २ हजार ७५९ उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्यामुळे त्यांच्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम व आयोगाच्या आदेशान्वये अपात्रतेची कारवाई करण्यासाठी प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहे.
नांदगाव तालुक्यात सर्वाधिक प्रकरणे
जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या उमेदवारांची सर्वाधिक १६८ संख्या नांदगाव तालुक्यातील आहे. वरुड १३२, मोर्शी १०७, धामणगाव १४७, अमरावती २७, भातकुली २१, चांदूररेल्वे ५९, तिवसा १२, मोर्शी ४६, अचलपूर ७, दर्यापूर २९८, अंजनगाव ४९, चिखलदरा १२ व धारणी येथील ५५ अशी उमेदवारांची संख्या आहे.

खर्च सादर नसलेल्या प्रकरणांची सद्यस्थिती
मे ते जुलै २०१५ मध्ये मुदती संपणाऱ्या ५८१ ग्रा.पं.च्या निवडणुकीत २ हजार ६०२ उमेदवारांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नाही.
आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ मध्ये मुदती संपणाऱ्या १११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १३३ उमेदवारांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नाही.
नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये मुदती संपणाऱ्या ५८ ग्रा. पं. च्या निवडणूकीत २४ उमेदवारांनी अद्याप खर्च सादर केला नाही.

८ तालुक्यातील १,४७२ प्रकरणे आदेशाच्या प्रक्रियेत
मागील वर्षी म्हणजे सन २०१५ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या व विहित मुदतीत खर्च सादर न करणाऱ्या ८ तालुक्यांमधील १,४७२ प्रकरणांत सुनावणी होऊन प्रकरणे आदेशासाठी ठेवण्यात आली आहेत. उर्वरित १,२८७ प्रकरणे पंजीबद्ध करण्यात आली असून कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालायातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक विभागाने सांगितले.

असा आहे अधिनियम
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ब) अन्वये ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक संपल्यापासून ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करणे अनिवार्य आहे.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १०-१ (अ) अन्वये ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या राखीव प्रभागातील विजयी उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे.

१,०९९ उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्र अप्राप्त
जिल्ह्यात नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्र स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यापूर्वी एप्रिल २०१५ मधील निवडणुकीतील विजयी उमेदवारांपैकी जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या १०१९ उमेदवारांविरोधात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासन कारवाई करीत आहे.

Web Title: 3,778 candidates ineligible! Election expenses, caste validity certificate is not present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.