५० कोटींचा मागितला लेखाजोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 09:01 PM2018-01-08T21:01:13+5:302018-01-08T21:01:35+5:30

जिल्हा परिषदेला २०१६-१७ या आर्थिक वर्षात विकास कामांसाठी मिळालेल्या निधीतून बहुतांश राशी अद्याप तिजोरीत पडून आहे.

50 crores demand | ५० कोटींचा मागितला लेखाजोखा

५० कोटींचा मागितला लेखाजोखा

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : अ‍ॅडिशनल सीईओंनी घेतली खातेप्रमुखांची बैठक

आॅनलाईन लोकमत
अमरावती : जिल्हा परिषदेला २०१६-१७ या आर्थिक वर्षात विकास कामांसाठी मिळालेल्या निधीतून बहुतांश राशी अद्याप तिजोरीत पडून आहे. त्यामुळे सदर विकासकामांच्या निधी खर्चाच्या नियोजनाचा आढावा व जमा खर्चाचा लेखाजोखा अ‍ॅडिशनल सीईओ विनय ठमके यांनी खातेप्रमुखाकडून मागविला आहे. त्यानुषंगाने आढावा बैठकी सुरू झाल्यात. उपलब्ध निधी विहित मुदतीत खर्च करण्याच्या दृष्टीने बैठकीत ठमके यांनी खाते प्रमुखांना सूचना दिल्यात.
जिल्हा परिषदेकडे विकासकामांसाठी उपलब्ध असलेला निधी निर्धारित कालावधी संपण्यासाठी आता केवळ तीन महिन्यांचा वेळ राहिला आहे. त्यामुळे सुमारे ५० कोटींपेक्षा अधिक निधी योग्य कामावर खर्च करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असल्याने प्रशाकीय यंत्रणा यासाठी जोमाने कामाला लागली आहे. जिल्हा परिषद समाजकल्याण, बांधकाम, आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, लघुसिंचन आदी विभागांना जिल्हा नियोजन समितीकडून मागील आर्थिक वर्षात कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. यापैकी काही निधी विकासकामांवर खर्च झाला आहे. मात्र अद्यापही त्यातील काही निधी पडून आहे. जिल्हा परिषदेला मिळणाºया विकास निधीची खर्च करण्याची मर्यादा २ वर्षांपर्यंत आहे. मार्च २०१८ अखेर ही मुदत संपणार आहे. त्यामुळे प्रशासनासोबतच पदाधिकाºयांवर निधी खर्चाचे आव्हान असल्याचे वृत्त 'लोकमत'ने ५ जानेवारी रोजी प्रकाशीत करताच या वृत्ताची जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेतली आहे. हा सर्व निधी मार्च अखेर पर्यत नियोजनानुसार खर्च केला जाईल, कुठलाही विकास निधी अखर्चीत न राहता तो विकासकामांवर पूर्णपणे खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेत वरिष्ठ अधिकारी बैठका घेऊन विकासकामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने कामाला लागले आहेत.

जिल्हा परिषदेला उपलब्ध झालेल्या निधीतील बरीच कामे सुरू आहेत. जी कामे सुरू झाली नाहीत, ती कामे मार्गी लावल्या जातील. त्यासाठी बैठकीत आढावा घेऊन खातेप्रमुखांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
- विनय ठमके, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी

Web Title: 50 crores demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.