पंचांग भारतीय संस्कृतीसाठी अद्भूत वरदानच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:15 AM2017-07-24T00:15:28+5:302017-07-24T00:15:28+5:30
मानवी जीवनात विज्ञान केंद्रबिंदू असल्याचा बहुंताश जणांचा विश्वास आहे. मात्र, आजचे आणि भविष्यातील विज्ञानाचा पाया हजारो वर्षांपूर्वीच भारतीय संस्कृतीने रोवला आहे.
इस्त्रोचे शास्त्रज्ञ नितीन घाटपांडे : हव्याप्र मंडळाच्या अभियांत्रिकीचा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मानवी जीवनात विज्ञान केंद्रबिंदू असल्याचा बहुंताश जणांचा विश्वास आहे. मात्र, आजचे आणि भविष्यातील विज्ञानाचा पाया हजारो वर्षांपूर्वीच भारतीय संस्कृतीने रोवला आहे. प्रामुख्याने भारतीय पंचागाला ज्योतिष्य शास्त्राचा भाग असल्याचा गैरसमज आहे. खरे पाहता पंचांग भारतीय संस्कृतीला मिळालेले अदभूत वरदानच असून त्यावर मानवी जीवनसृष्टी अवलंबून असल्याचे मत इस्त्रोचे शास्त्रज्ञ (बंम्हांड वैज्ञनिक) नितीन घाटपांडे यांनी यांनी मांडले.
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तंत्रज्ञान महोत्सवातील व्याख्यानात हिंदू पंचांगाला खगोल शास्त्रीय आधार या विषयावर ते संबोधित करीत होते. यावेळी व्यासपीठावर हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, कार्यक्रम अध्यक्ष कोषाध्यक्ष सुरेश देशपांडे, अभियांत्रिकीचे संचालक श्रीकांत चेंडके, सचिव माधुरी चेंडके, प्राचार्य ए.बी.मराठे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात नितीन घाटपांडे याचा सपत्नीक सत्कार करण्यात आला आहे. पुढे बोलताना घाटपांडे यांनी पंचांगाद्वारे काल गणा, ग्रह, तारे, नक्षत्र, योग, वार, तिथी, ग्रहांची गती अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. याच पंचागाच्या आधारे भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) ने मंगलयान, चंद्रयानसारखे अवकाश प्रकल्प यशस्वी केल्याचेही घाटपांडे म्हणाले. पंचांगांद्वारे प्रत्येक दिवस, तास आणि सेंकद असे सूक्ष्म व अतिसूक्ष्म कालयोग, तिथी, वार, करण आदी घटकांची शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी माहिती दिली.
या पंचांगाचा उपयोग प्रत्येकाने आपल्या जीवनात केल्यास सकारात्मक बदल निश्चितपणे घडेल, असा विश्वास नितीन घाटपांडे यांनी व्यक्त केला. प्रास्तविक सुरेश देशपांडे, संचालन व आभार सोनटक्के यांनी केले.