अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या विवाहितेला पेटविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 05:44 AM2017-10-23T05:44:44+5:302017-10-23T05:44:47+5:30
अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पत्नीला रॉकेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी उघडकीस आला.
मंगरूळ चव्हाळा
(अमरावती) : अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पत्नीला रॉकेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी उघडकीस आला. याबाबत विवाहितेने पती व मोठ्या जावेविरुद्ध शनिवारी जऊळका (जि. वाशिम) पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
लोहगाव येथील २७ वर्षीय विवाहितेचा पती रणजित सदानंद सानप याचे त्याच्या भावाच्या पत्नीचे अनैतिक संबंध आहेत. यात अडसर ठरणाºया विवाहितेकडे दुचाकी घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणण्याची मागणी पतीने केली. दरम्यान, २० आॅक्टोबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास पती व जाऊने विवाहितेला मारहाण केली. या वेळी रणजितने अंगावर रॉकेल ओतून तिला पेटविण्याचा प्रयत्न केला. विवाहितेने त्यांना हिसका देत स्वत:ची सुटका करवून घेत, माहेर गाठले, असे तक्रारीत म्हटले आहे.