विद्युत टॉवर विरोधात बळीराजा आक्रमक
By admin | Published: February 4, 2015 11:07 PM2015-02-04T23:07:34+5:302015-02-04T23:07:34+5:30
महाराष्ट्रभरात विद्युत टॉवर कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात फसवणुक करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी क्रॉग्रेस पक्ष व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेने केला
अमरावती : महाराष्ट्रभरात विद्युत टॉवर कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात फसवणुक करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी क्रॉग्रेस पक्ष व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेने केला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वाढवून देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा शेतकरी लाक्षणिक उपोषण करणार असा इशारा मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेतून संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विद्युत लाईनचे कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. हे कामे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण व वितरण कंपनी तसेच महाराष्ट्र ईस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनी लि., पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लि. व धुळे ट्रान्समिशन कंपनी लि. अश्या ११ कंपन्या करीत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात पुर्ण टॉवर आल्यास त्यांना किती रक्कम द्यावी याबद्दल कंपनीकडे कोणतेही निकष नाहीत असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
जी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येते ती रक्कम शेकतऱ्यांसाठी अतिशय कमी आहे. नुकसान भरपाईची रक्कम अतिशय कमी असल्याच्या अनेक तक्रारी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस मिलींद पाटील व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल नागरे यांच्याकडे आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम वाढून देण्यात यावी असे पत्र शासनाला देण्यात आले आहे. अनेकदा पत्र देऊनही कंपनीने कोणतेही उत्तर अद्यापर्यंत दिले नाही. त्यामुळे औरंगाबाद येथील विधीज्ञ बिपीन पाटील यांच्या मार्फत सर्वच कंपन्याना व शासनाला संघटनेच्यावतीने नोटीस पाठविण्यात आली आहे. या समस्येवर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४ बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांने न्याय मिळावा या उद्देशाने राष्ट्रवादी कॉग्रेंस पक्ष व महासम्राट बळीराजा शेतकरी संघटना सरसावली आहेत. अशी माहिती विजय पाटील, अनिल नागरे व दिनेश व पात्रे यांनी पत्रपरिषदेत दिली.