फी भरण्यासाठी पैसे नसल्यानं शेतक-याच्या मुलीची आत्महत्या, अमरावतीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 03:31 PM2017-08-24T15:31:09+5:302017-08-24T15:31:37+5:30

बीडमध्ये बी.कॉम.द्वितीय वर्षाच्या प्रवेशाची मुदत संपत आली असताना केवळे पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने नैराश्यातून तारखडे येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

Failure to pay the fee, the farmer's daughter commits suicide, a shocking incident in Amravati | फी भरण्यासाठी पैसे नसल्यानं शेतक-याच्या मुलीची आत्महत्या, अमरावतीतील धक्कादायक घटना

फी भरण्यासाठी पैसे नसल्यानं शेतक-याच्या मुलीची आत्महत्या, अमरावतीतील धक्कादायक घटना

Next

तिवसा (अमरावती), दि. 24 -  फी भरण्यासाठी पैसे नसल्यानं शेतकरी कुटुंबातील एका मुलीनं स्वतःचं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. बी.कॉम.द्वितीय वर्षाच्या प्रवेशाची मुदत संपत आली असताना केवळे पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने नैराश्यातून तारखडे येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. पुरेसं आर्थिक पाठबळ नसल्याने घरातून प्रवेशाचे 1 हजार रूपये मिळण्यास विलंब होत होता यामुळे विद्यार्थिनीनं विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नजीकच्या तारखेड येथे घडली.
मिनल डाहे (१८ वर्षे) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिनलच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिच्या कुटुंबाकडे अवघी दोन एकर शेती आहे. त्यात मोठी बहीण आणि लहान भाऊ शिक्षण घेत आहेत. तरीही शिक्षणाची प्रचंड आवड असलेल्या मिनलने विपरीत परिस्थितीतही बी.कॉम. भाग-1 ची परीक्षा उत्तीर्ण केली. ती येथील यादव देशमुख महाविद्यालयात शिकत होती. याच महाविद्यालयात बी.कॉम.द्वितीय वर्षाला तिला प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी महाविद्यालयात नियमामुसार १ हजार रूपयांची प्रवेश शुल्क भरायचे होते. मिनलने घरी पैशांची मागणी केली होती. मात्र, यंदा पीक-पाण्याची स्थिती अत्यंत वाईट असल्याने संकटग्रस्त असलेल्या मिनलच्या पालकांनी तिला दोन दिवस थांबण्यास सांगितले. मात्र, प्रवेशाची मदत संपत आल्याने पैशांअभावी आपला द्वितीय वर्षात प्रवेश होईल की नाही, ही चिंता मिनलला सतावत होती.
एकीकडे कुटुंबाची दैनावस्था व दुसरीकडे शिक्षणाची ओढ या द्विधा मानसिकतेत अडकलेल्या मिनलने हा ताण सहन न होऊन टोकाचा निर्णय घेतला. घरातील सर्व सदस्य शेतात गेले असताना तिने किटकनाशक प्राशन केले व इहलोकाची यात्रा संपविली. कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी लगोलग गंभीर अवस्थेत मिनलला आधी ग्रामिण रूग्णालयात व नंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. तिवसा पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला आहे. शिक्षण घेऊन समाजसेवा करण्याचे मिनलचे स्वप्न होते. मात्र, अवघ्या १ हजारांपायी तिचे हे स्वप्न बेचिराख झाल्याची खेदजनक भावना तिच्या शोकाकुल कुटुंबीयांनी व्यक्त केली.

Web Title: Failure to pay the fee, the farmer's daughter commits suicide, a shocking incident in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.