जिल्ह्यात प्रथम सौरऊर्जा प्रकल्प गव्हाणकुंडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:11 PM2017-12-20T23:11:32+5:302017-12-20T23:11:50+5:30

तालुक्याच्या वैभवात भर टाकणारा २० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प गव्हाणकुंड येथे साकारणार आहे.

The first solar power project in the district is Gavankund | जिल्ह्यात प्रथम सौरऊर्जा प्रकल्प गव्हाणकुंडात

जिल्ह्यात प्रथम सौरऊर्जा प्रकल्प गव्हाणकुंडात

Next
ठळक मुद्दे२० मेगावॅटची निर्मिती : सिंचन क्षेत्रात वाढ

आॅनलाईन लोकमत
वरूड : तालुक्याच्या वैभवात भर टाकणारा २० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प गव्हाणकुंड येथे साकारणार आहे. यामुळे तालुक्यातील विजेचा तुटवडा कमी होऊन शेतकऱ्यांना वीज मिळेल. सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. या प्रकल्पासाठी आमदार अनिल बोंडे यांनी सतत पाठपुरावा केला.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत हा प्रकल्प गव्हाणकुंडला साकारला जाणार आहे. याकरिता वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दीड वर्षांपासून सर्व्हेक्षण करून याचे नियोजन व प्रकल्प अहवाल तयार केले. या प्रकल्पामुळे वरूड तालुक्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त २४ डिसेंबरला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. २० मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पामुळे गव्हाणकुंडचे महत्त्व अधिक वाढले असून सिंचनासह राजगारीलासुद्धा चालना मिळेल, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहे.

Web Title: The first solar power project in the district is Gavankund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.