पाच घरे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 10:06 PM2018-05-05T22:06:11+5:302018-05-05T22:06:11+5:30

अंजनगाव सुर्जीपासून सात किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कापूसतळणीत शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. यात पाच घरे जळून खाक झाली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Five houses burnt | पाच घरे जळून खाक

पाच घरे जळून खाक

Next
ठळक मुद्देकापूसतळणी येथे अग्निप्रकोप : संसार उघड्यावर, चुलीतील राखडीने लागली आग

लोकमत न्यूज नेटवर्क
वनोजाबाग : अंजनगाव सुर्जीपासून सात किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कापूसतळणीत शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. यात पाच घरे जळून खाक झाली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या आगीत पाच कुटुंबातील सदस्य बेघर झालेत.
कापूसतळणीतील एका घराला आग लागली, त्यामुळे त्या घरातील कुटुबीयांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र, काही वेळातच आगीचे चार ते पाच घरांना विळख्यात घेतले. या आगीची माहिती अग्निशमनला देण्यात आली. अग्निशमन पथक पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. प्रत्येक जण आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. काही वेळात अग्निशमन पथक पोहोचले. दोन तास पाण्याचा मारा केल्यानंतर आग नियंत्रणात आली. या आगीत भाऊराव तायडे, मधुकर नंदनवार, विजय नंदनवार, बापू नंदनवार, सुनील शामराव सरदार यांची घरे जळून खाक झाले. या आगीत त्यांच्या घरातील टीव्ही, कपडे, फर्निचर, कपडे व दस्तावेजांची राखरांगोळी झाली. आग विझविताना सुनील सरदार किरकोळ जखमी झाले. गोठ्यातील एक गाय सुध्दा किरकोळ भाजली. चुलीतील राखीमुळे ही आग लागल्याची चर्चा गावात सुरु होती. तहसीलदार पुरुषोत्तम भुयारी व आरोग्य अधिकारी सुधीर डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
बाधित नागरिकांना सोमवारी शासकीय मदत
माहिती मिळताच तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, मंडळ अधिकारी, अविनाश पोटदुखे, तलाठी दिनेश वानखडे, सरपंच, पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले. आगबाधितांना सोमवारी मदत देण्याचे आश्वासन तहसिलदारांकडून देण्यात आले. सानुग्रह मदत म्हणून प्रत्येकी १ हजारांची मदत देण्यात आली. गावातील रेशनदुकानदाराला धान्य देण्याच्या सूचना करण्यात आली. बाधितांच्या राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीत करण्यात आली.

Web Title: Five houses burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग