ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन थेट बँक खात्यात, ग्रामविकास विभाग आणि एचडीएफसी यांच्यात करार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 03:39 PM2018-01-10T15:39:46+5:302018-01-10T15:40:14+5:30

ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन आॅनलाइन पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग व एचडीएफसी बँक त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

Gram Panchayat Employees' Salary In Directly In Bank Accounts, Agreement With Rural Development Department And HDFC | ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन थेट बँक खात्यात, ग्रामविकास विभाग आणि एचडीएफसी यांच्यात करार

ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन थेट बँक खात्यात, ग्रामविकास विभाग आणि एचडीएफसी यांच्यात करार

googlenewsNext

अमरावती : ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन आॅनलाइन पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग व एचडीएफसी बँक त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात शासनस्तरावर करार झाला आहे.
ग्रामपंचायत कर्मचा-यांना किमान वेतन वेळेवर मिळत नाही, त्यांचे वेतन बँक खात्यात जमा करावे, याबाबतची मागणी ग्रामपंचायत कर्मचा-यांनी शासनाकडे केली होती.

त्यानुसार सर्व ग्रामपंचायत कर्मचा-यांचे बँक खाते आधारकार्ड संलग्न करून वेतन, राहणीमान भत्त्यासह परस्पर त्यांच्या बँक खात्यात आॅनलाइन पद्धतीने जमा करण्याची बाब शासनस्तरावर विचाराधीन होती. त्यासंदर्भात ग्रामविकास विभाग व एचडीएफसी यांच्यात करार होऊन ग्रामपंचायत कर्मचारी आॅनलाइन वेतन प्रणाली आॅनलाइन रिअल टाईम आधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ग्रामसेवकामार्फत ग्रामपंचायत कर्मचा-यांची सर्वंकष माहिती आॅनलाइन भरण्यात येईल. गटविकास अधिका-यांकडून ती प्रणाली तयार करण्यात येईल. ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वेतन देयकातील शासनाचा देय हिस्सा त्या ग्रामपंचायतींच्या लोकसंख्या व उत्पन्नाच्या आधारावर संगणककाद्वारे अंतिम केलेला आहे. आॅनलाइन वेतन पद्धती, कार्यप्रणाली संनियंत्रणाची जबाबदारी जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिका-यांची व राज्यस्तरावर राज्य प्रकल्प संचालक राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान यांच्याकडे स्थापन केलेल्या कक्षाची राहील.
शासनाने याबाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार व शासनाच्या सूचनेप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल.
- माया वानखडे, प्रभारी उपमुख्यकार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग

Web Title: Gram Panchayat Employees' Salary In Directly In Bank Accounts, Agreement With Rural Development Department And HDFC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.