अवकाळी, गारपिटीने व-हाडात १३९ कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 03:50 PM2018-02-27T15:50:27+5:302018-02-27T15:50:27+5:30

मागील आठवड्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामध्ये अमरावती विभागातील १,१५,२७२ शेतक-यांचे १,१४,६२५ हेक्टरमधील १३९ कोटी ६२ लाख रुपयांचे नुकसान झाले.

hail Storm News | अवकाळी, गारपिटीने व-हाडात १३९ कोटींचे नुकसान

अवकाळी, गारपिटीने व-हाडात १३९ कोटींचे नुकसान

googlenewsNext

अमरावती - मागील आठवड्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामध्ये अमरावती विभागातील १,१५,२७२ शेतक-यांचे १,१४,६२५ हेक्टरमधील १३९ कोटी ६२ लाख रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाच्या १२ फेब्रुवारीच्या पत्रानुसार विभागातील सर्व जिल्ह्यात ३३ ते ५० व त्यापेक्षा अधिक नुकसान याप्रमाणे सर्वेक्षण करण्यात येऊन निधीच्या मागणीसह अहवाल शनिवारी शासनाला सादर झाला. या आपत्तीमध्ये राज्यात सर्वाधिक नुकसान अमरावती विभागात झाले.

जिरायती क्षेत्रात १७ हजार ३८६ शेतक-यांचे १२,३०७ हेक्टरमध्ये ८ कोटी ३६ लाख ८५ हजाराचे ३३ ते ५० टक्के मर्यादेत नुकसान झाले आहे. यामध्ये मका ५५.३३ हेक्टर, ज्वारी १५१.४, तूर १६१.५८ , गहू ४३१ , हरभरा १०,६३७, व इतर ८६९ हेक्टरमध्ये नुकसान झाले. अमरावती जिल्हा ४,८२९ हेक्टर, अकोला ८५०.७०, यवतमाळ १२५१ बुलडाणा २,०१७ व वाशिम जिल्ह्यात ३३५८ हेक्टरमध्ये नुकसान झाले. ३३ ते ५० टक्के मर्यादेत २७,८७९ शेतक-यांचे २१,४०० हेक्टरमधील २८ कोटी ८९ लाखांचे नुकसान झाले. यामध्ये टरबुज ५.८९ हेक्टर, कांदा ६२७.११, कांदा बी ६३.१६, केळी, पपर्ई १२३.४७, गहू ५०५०, हळद ११.८२, हरभरा १०,५३३, मका १८४, भुईमुग २१.८, भाजीपाला ८४३.१९ व इतर पिकांचे ३९३५ हेक्टरमध्ये नुकसान झाले. यामध्ये अमरावती ३,४६६ हेक्टर, अकोला ४४३.५२, यवतमाळ ९२२, बुलडाणा २१९ व वाशिम जिल्ह्यात २१९ हेक्टरमध्ये नुकसान झाले. 

३३ ते ५० टक्कयांमध्ये ५९८८ शेतकºयांचे ५०४४ हेक्टरमध्ये ९ कोटी १३ लाखांचे नुकसान झाले. यामध्ये संत्रा, लिंबू, मोसंबी ४६७५ हेक्टर, आंबा ५९, डाळिंब १३९.२९ हेक्टर, केळी ४१.४३, पपई ८.७३ व इतर पिकांचे १४२ हेक्टरमध्ये नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात ६.६८ कोटी, अकोला १.०१ कोटी, यवतमाळ ४४.६५ लाख, बुलडाणा ३३.३१ लाख, बुलडाणा ६५.२३ लाखांचे नुकसान झाले आहे.

 ६४ हजार शेतक-यांचे ५० टक्क्यांवर पिके बाधित
- या आपत्तीमध्ये ६४,०१९ शेतक-यांचे ७५,९०२ हेक्टरमध्ये ९३ कोटी २४ लाख ३४ हजारांचे नुकसान झालेले आहे.
- जिरायती क्षेत्रात ३१,९०५ शेतक-यांचे २७,१६३ हेक्टरमध्ये १८ कोटी ४९ लाख ४७ हजारांचे नुकसान झाले.
- बागायती क्षेत्रात ११,०५० हजार शेतक-यांचे २८,८४५ हेक्टरमध्ये  ३८ कोटी ९४ लाखांचे नुकसान झालेले आहे.
- फळपिकामध्ये २१,०६४ शेतकºयांचे १९,८९३ हेक्टरमध्ये ३५ कोटी ८० लाख ७७ हजारांचे नुकसान झाले.

Web Title: hail Storm News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.