‘तो’ धोकादायक खड्डा बुजविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 10:50 PM2018-07-13T22:50:15+5:302018-07-13T22:50:34+5:30

अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाच्या उतारावर जीवघेणा खड्डा तयार झाला होता. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यावर प्रशासनाने दखल घेत खड्डा बुजविला.

'He' got dangerous pit | ‘तो’ धोकादायक खड्डा बुजविला

‘तो’ धोकादायक खड्डा बुजविला

Next
ठळक मुद्दे‘लोकमत’ वृत्ताची दखल : पथदिवे सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाच्या उतारावर जीवघेणा खड्डा तयार झाला होता. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यावर प्रशासनाने दखल घेत खड्डा बुजविला.
अमरावती मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाच्या उतारावर पावसाच्या पाण्यामुळे भला मोठा खड्डा तयार झाला तसेच पथदिवे बंद असल्यामुळे रात्री ही जागा धोकादायक झाली होती. ‘लोकमत’ने जीवघेण्या खड्ड्याचे सचित्र वृत्त प्रकाशित केल्यावर त्याच दिवशी प्रशासनाने हा खड्डा बुजविला. वाहनचालकांना मोठा यामुळे दिलासा मिळाला आहे. आता उड्डाणपुलावरील पथदिवे सुरू करावे, अशी वाहनचालकांची मागणी आहे.
गिट्टी धोक्याची
वर्दळीचा अमरावती ते बडनेरा मुख्य मार्ग साईनगरपासून ते जुन्या वस्तीपर्यंत मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. रस्त्याची गिट्टी उखडली आहे. रस्त्याच्या दुतर्फा उखडलेली गिट्टी साठून असल्याने दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहे. पावसात तर अनेक वाहने यावरून घसरली आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे वाहनचालकांमध्ये कळकळीने बोलले जात आहे.

Web Title: 'He' got dangerous pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.