जड वाहनांना ‘नो एंट्री’ जैसे थे
By admin | Published: February 5, 2015 11:01 PM2015-02-05T23:01:35+5:302015-02-05T23:01:35+5:30
शहरात जड वाहतुकीला साडेसतरा तास प्रवेशबंदी करण्यात आली होती. या विरोधात ट्रान्सपोर्ट असोसिएशनद्वारा आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनाची तीव्रता पाहून १२ फेब्रुवारीपर्यंत
अमरावती : शहरात जड वाहतुकीला साडेसतरा तास प्रवेशबंदी करण्यात आली होती. या विरोधात ट्रान्सपोर्ट असोसिएशनद्वारा आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनाची तीव्रता पाहून १२ फेब्रुवारीपर्यंत पूर्वीप्रमाणेच जडवाहनांना शहरात प्रवेश न देण्याचा निर्णय पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
पोलीस आयुक्तालयात उपायुक्त बी.के. गावराने यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती ट्रान्सपोर्ट असोसिएशन, व्यापारी व बिल्डर असोसिएशनची बैठक गुरुवारला पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या विषयी अंतीम निर्णय १२ फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार आहे.
शहरातील वाढत्या अपघातामुळे जड वाहनांच्या प्रवेशावर पोलीस आयुक्तालयाने निर्बंध घातले होते. याचा बैठकीत विरोध करण्यात आला. पोलीस प्रशासन मनमानी करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या निषेधार्थ त्यांनी वाहतूक बंद केली. याचा फटका बाजार समिती व व्यापाऱ्यांना बसला. उचल अभावी बाजार समितीत शेतमालाचे ढिग लागले. समाजघटकातील नाराजी लक्षात घेता पोलीस आयुक्तालयाने हा निर्णय घेतला. बैठकीला चेम्बर आॅफ महानगर अमरावतीचे अध्यक्ष सुरेश जैन, घनश्याम राठी, विनोद कलंत्री, परमानंद सिंघानिया, सतीश मालू आदी उपस्थित होते. १२ फेब्रुवारीला या प्रकरणी निर्णय बैठकीतून घेण्यात येईल. (प्रतिनिधी)