आदिवासी विद्यार्थ्यांची मागण्यांसाठी पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 11:13 PM2017-09-12T23:13:24+5:302017-09-12T23:13:24+5:30

प्रकल्प कार्यालयांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांकरिता चिखलदरा येथे वसतिगृहाची व्यवस्था नगरपरिषदेच्या हॉलमध्ये करण्यात आली.

Hiking for the demands of tribal students | आदिवासी विद्यार्थ्यांची मागण्यांसाठी पदयात्रा

आदिवासी विद्यार्थ्यांची मागण्यांसाठी पदयात्रा

Next
ठळक मुद्देपायपीट करत हरिसालपर्यंत पोहोचले : प्रकल्प अधिकाºयाशी चर्चा नाकारली

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : प्रकल्प कार्यालयांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांकरिता चिखलदरा येथे वसतिगृहाची व्यवस्था नगरपरिषदेच्या हॉलमध्ये करण्यात आली. तेथे सोईसुविधांचा अभाव असल्याने प्रकल्प अधिकारी विजय राठोड यांना भेटण्याकरिता ६४ आदिवासी विद्यार्थी पहाटे सहा वाजतापासून पायपीट करीत हरिसाल पर्यंत पोहचले आहे. त्यांचा प्रकल्प कार्यालयात पोहचण्याचा प्रवास सुरूच आहे.
विद्यार्थी पायपीट करीत येत असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी विजय राठोड यांना मिळाली. त्यांनी लगेच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता दोन विस्तार अधिकारी व सहा प्रकल्प अधिकाºयांना चिखलदरा ते हरिसाल प्रवासादरम्यान पाठविले. या सर्वांनी विद्यार्थ्यांना विनंती करून समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला परंतु विद्यार्थी ऐकण्यास तयार नव्हते. त्या दरम्यान चिखली फाट्याजवळ प्रकल्प अधिकारी विजय राठोड यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना थांबवून ‘समस्या सांगा’ आपण काहीतरी मार्ग काढू अशी विनंती केली. विद्यार्थ्यांनी त्यांचे एकही न ऐकता प्रकल्प कार्यालयातच आम्ही भेटू असे बोलून प्रवास सुरूच ठेवला.
काय आहे अडचण ?
मुलांना स्वतंत्र वसतिगृह होते व मुलींचे वसतिगृह हे भाड्याच्या रूममध्ये होते. नवीन वसतिगृहाचे बांधकाम (मुलींच्या) सुरू असल्याने मुलांच्या वसतिगृहात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता मुलींना ठेवण्यात आले व मुलांना न. प. च्या हॉलमध्ये तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यात आले आहे. तेथे सोईसुविधांचा अभाव असल्याने प्रकल्प अधिकाºयाकडे पायपीट करत तक्रार करण्याकरिता विद्यार्थी पोहचले आहे.
तीन दिवसांत नवीन वसतिगृह तयार करून द्या
आम्हाला चिखलदरा येथे त्या न. प. च्या हॉलमध्ये राहायचे नसून तीन दिवसात नवीन वसतिगृह तयार करून देण्याची चर्चा ते विद्यार्थी करीत होते व अधिकाºयांशी व पत्रकारांशीही त्यांनी बोलण्याचे टाळले.

विद्यार्थ्यांशी मध्ये थांबवून चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी माझे काहीही न ऐकता प्रकल्प कार्यालयातच पायदळ येवून बोलू असे सांगितले.
- विजय राठोड,
प्रकल्प अधिकारी,

Web Title: Hiking for the demands of tribal students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.