आॅटोचालकाची बसचालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:14 PM2018-01-12T23:14:48+5:302018-01-12T23:16:02+5:30

आगारातून नागपूरकडे जाणाऱ्या बसच्या मार्गावर उभी असलेली आॅटोरिक्षा हटविण्याचे सांगताच आॅटोरिक्षाचालकाने बसचालकास शिवीगाळ व मारहाण केली.

Hit the bus driver | आॅटोचालकाची बसचालकास मारहाण

आॅटोचालकाची बसचालकास मारहाण

Next
ठळक मुद्देशेकडो प्रवासी अडकले : आगार दोन तास बंद; विद्यार्थी, रुग्ण, कर्मचाऱ्यांना फटका

आॅनलाईन लोकमत
परतवाडा : आगारातून नागपूरकडे जाणाऱ्या बसच्या मार्गावर उभी असलेली आॅटोरिक्षा हटविण्याचे सांगताच आॅटोरिक्षाचालकाने बसचालकास शिवीगाळ व मारहाण केली. परतवाडा आगारापुढे शुक्रवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली. यानंतर आरोपींच्या अटकेची मागणी करीत एसटी चालकांनी तब्बल दोन तास बस आगारात उभ्या ठेवल्या. विद्यार्थी, रुग्ण, कर्मचाºयांसह सर्वसामान्य नागरिकांना हा वेळ ताटकळत काढावा लागला.
संतोष हिरालाल खोलापुरे (४९, रा. जुना सराफा, अचलपूर) असे आरोपी आॅटोरिक्षाचालकाचे नाव आहे. सूरज आखेडे (३१, रा. जळकापूर) असे फिर्यादी बसचालकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता एमएच ४० वाय ५९३८ क्रमांकाची परतवाडा-मोर्शी-नागपूर बसफेरी आगाराबाहेर काढत असताना सदर आॅटोरिक्षा रस्त्यात उभा होता. ती बाजूला घेण्यास सांगताच आॅटोरिक्षाचालक संतोष खालापुरे याने हुज्जत घातली आणि शिवीगाळ, ओढाताण करीत मारहाण केली. तशी फिर्याद परतवाडा पोलिसांत दाखल करण्यात आली. आरोपीविरुद्ध भादंविच्या ३५३, ३२३, १८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चक्काजाम आंदोलन
चालक सूरज उतखेडे यांना मारहाण झाल्याचे माहिती होताच, आरोपीला अटक होईस्तोवर एकही बस जागेवरून हलविणार नसल्याचे चालकांनी जाहीर केले. तब्बल दोन तास शेकडो प्रवाशांसह शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, रुग्ण, कर्मचारी ताटकळत राहिले. नगरपालिका उपाध्यक्ष शशिकांत जैस्वाल, नीलेश सातपुते, बंडू घोम, अनिल पिंपळे यांनी पळून गेलेल्या आरोपींसोबत संवाद साधून परतवाडा पोलिसांत नेले. त्यानंतरच चालकांनी बस आगाराबाहेर काढल्या.

शहराची वाहतूक व्यवस्था पूर्णत: ढासळली असल्याचे चित्र असताना येथील वाहतूक शाखा बंदचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. आगारापुढे आॅटोचालकांची दादागिरी दररोजची झाली असून, यातून मोठा संघर्ष होण्याची शक्यता अनेक चालकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद बसचालकाने दिली. त्यावरून आरोपीस अटक करण्यात आली. यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
- पी.डी. तळी, सहायक पोलीस निरीक्षक

Web Title: Hit the bus driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.