गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी कथ्थक नृत्याविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 10:25 PM2018-01-02T22:25:40+5:302018-01-02T22:26:30+5:30
येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या बाराशेहून अधिक विद्यार्थिनी एकाच मंचावरून कलांजली एक अद्भूत कथक नृत्याविष्कार गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी सादर करणार असल्याची माहिती मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या बाराशेहून अधिक विद्यार्थिनी एकाच मंचावरून कलांजली एक अद्भूत कथक नृत्याविष्कार गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी सादर करणार असल्याची माहिती मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.
राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित स्कूल आॅफ स्कॉलर्स अमरावतीतर्फे ६ जानेवारी रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच वाजता गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या बाराशेहून अधिक विद्यार्थिनी एकाच मंचावरून २० मिनिटांच्या ठराविक कालावधीत कथक नृत्याविष्कार सादर करणार असल्याची माहिती देण्यात आली. या कथक नृत्याविष्कारात केवळ विद्यार्थिनींचाच सहभाग असणार आहे. आंतरराष्टÑीय स्तरावर विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, त्यांच्यात कलारूची वाढावी या उद्देशातूनच आम्ही कथक नृत्याविष्काराची निवड केली आहे.
मागील दोन वर्षांपासून आमची संस्था यासाठी काम करीत आहे. इयत्ता १ ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी नृत्य करणार आहेत. शाळेचे नृत्य, संगीत, क्रीडा, चित्रकला आणि गणित विभागाचे शिक्षक या अद्भूत कथक नृत्याविष्काराच्या तयारीला लागले आहे. संपूर्ण जगात हा विश्वविक्रम पोहोचावा, त्याचे धाडस आमच्या संस्थेकडून केवळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी करण्यात येत आहे. संस्कृत, गणित, खेळ, नृत्य या सर्वांची सांगड घालणारा तसेच विद्यार्थ्यांच्या एकूणच गुणांमध्ये भर घालणारा आविष्कार आम्ही सादर करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पत्रपरिषदेला संचालिका आभा मेघे, प्राचार्य सुरेश लकडे, उपप्राचार्य समिधा नाहर, नीलय वासाडे, विशाल चव्हाण आदी उपस्थित होते.