महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मोबदला अडकला

By admin | Published: April 25, 2015 12:23 AM2015-04-25T00:23:40+5:302015-04-25T00:23:40+5:30

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विविध कामावर काम करणाऱ्या मेळघातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील..

The Maharashtra Rural Employment Guarantee Scheme has got reimbursed | महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मोबदला अडकला

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मोबदला अडकला

Next

मजुरांना फटका: डिजिटल स्वाक्षरी नसल्याचा परिणाम
अमरावती: महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विविध कामावर काम करणाऱ्या मेळघातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील मजूरांना तालुका पातळीवर असलेल्या सेल मधून मजुरीचा मोबदला दिला जातो. मात्र, ३१ मार्च पासून डिजिटल स्वाक्षरीला मुदतवाढ दिली नसल्याने करोडो रूपयांची निधी अडकून पडला आहे.
मेळघाटातील आदिवासी मजूरांना रोजगार मिळावा यासाठी प्रशासना मार्फत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक कामे सुरू आहेत . या कामावर काम करणाऱ्या मजुरांना वेळेवर मजूर मिळत नाही अशातच अल्पशी मजुरी असल्याने मजूरही रोजगार हमी योजनेच्या कामांवर येत नाहीत. या स्थितीत जे मजूर प्रशासनाने सुरू केलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामावर आहेत त्यांना त्याच्या कामाचा मोबदला त्वरीत मिळावा याकरीता जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावर चिखलदरा व धारणी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे सुविधेसाठी निधी वितरणासाठी सेल सुरू केले आहेत. सदरचे कामकाज हाताळण्यासाठी महसुल व पंचायत समितीमधील एका कर्मचाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. मजुरांचा मोबदला वितरीत करताना संबंधित कर्मचाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी असल्याशिवाय हा मोबदला देता येत नाही. यासाठी प्रशासनाने ठरवून दिलेली डिजिटल स्वाक्षरीची मुदत ३१ मार्च रोजी संपली आहे. त्यानंतरही डिजिटल स्वाक्षरींचे नुतनीकरण केले नाही. परिणामी मेळघाटातील आदिवासी मजुरांचा अद्यापर्यतही मोबदला मिळाला नसल्याने रोहयोच्या कामावरही याचा परिणाम झाला आहे. यामुळे मेळघाटातील डिजिटल स्वाक्षरींचा तिढा जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरीत सोडवावा, अशी मागणी चिखलदरा तालुका कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष महेंद्रसिंग गैलवार यांनी केली आहे. हा प्रश्न निकाली न काढल्यास तहसील कार्यालयावर आंदोलनाचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

Web Title: The Maharashtra Rural Employment Guarantee Scheme has got reimbursed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.