मेळघाटातील सागवानाची ओळख सांगणारे खिळे आणि बिंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 03:13 PM2018-12-08T15:13:58+5:302018-12-08T15:14:55+5:30

खिळा आणि बिंदीवर मेळघाटातील सागवान देशभर ओळखल्या जाते. बिंदी आणि खिळा यांनी मेळघाटातील सागवानला ओळख दिली असून, आॅनलाइन लिलावात त्याला महत्त्व प्राप्त आहे. यातून कोट्यवधीचा राजस्व शासनाला मिळत आहे.

Nails and bindi that tell the identity of Teak wood in Melghat | मेळघाटातील सागवानाची ओळख सांगणारे खिळे आणि बिंदी

मेळघाटातील सागवानाची ओळख सांगणारे खिळे आणि बिंदी

googlenewsNext
ठळक मुद्देया विक्रीतून एकट्या परतवाडा डेपोतूनच वर्षाकाठी १५ ते २५ कोटींचा महसूल वनविभागाला पर्यायाने शासनाला मिळतो.

अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खिळा आणि बिंदीवर मेळघाटातील सागवान देशभर ओळखल्या जाते. बिंदी आणि खिळा यांनी मेळघाटातील सागवानला ओळख दिली असून, आॅनलाइन लिलावात त्याला महत्त्व प्राप्त आहे. यातून कोट्यवधीचा राजस्व शासनाला मिळत आहे.
पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत परतवाडा येथे लाकडाचा मोठा शासकीय डेपो आहे. या डेपोत मेळघाट जंगलातील लाकूड पाठविताना त्याचे चालान बनविले जाते. या चालानवर त्या लाकडाची लांबी, रुंदी, गोलाई, कुपनंबर, वनर्तुळ, वनखंड क्रमांकासह वनपरिक्षेत्राचे नाव नमूद असते. पुढे हे चालान डेपोतील लाकडावर चालविले जाते. हे चालान चालवताना त्या लाकडावर लाकडाची लांबी, गोलाई आणि जंगल व डेपोची ओळख, लॉट नंबर लोखंडी खिळ्यांच्या साहाय्याने अंकित केला जातो. याकरिता मान्यताप्राप्त, नोंदणीकृत अशा खिळ्यांचाच वापर वनविभागाकडून केला जातो. हातोडीच्या सहाय्याने खिळे मारण्याचे कौशल्य अवगत असलेला कर्मचारी किंवा खासगी व्यक्तीच हे काम करू शकतो. लोखंडी छन्नीसारखे असलेल्या या खिळ्यांवर शून्यापासून नऊपर्यंत अंक कोरलेले असतात. या अंकाचीही स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे.
चालान चालवताना जंगलातून डेपोत आलेल्या प्रत्येक लाकडावर त्यानुसार लाकडाची माहिती स्पष्ट करणारे खिळे मारल्या जातात. मारलेल्या खिळ्यांवरून मेळघाटातील लाकूड देशपातळीवर कुठेही ओळखता येते. या खिळ्यांवरूनच लाकूड कुठल्या डेपोचे, कुठल्या जंगलातले, कुठल्या कुपातील व कुठल्या लॉटमधील आहे, याची माहिती उपलब्ध होते.
खिळे मारल्यानंतर लाकडाचे एकूण ७७ श्रेणींमध्ये विभागणी केली जाते. ग्रेडिंगवरून लाकडाचा दर्जा माहीत होतो. ग्रेडिंगमध्ये एकूण सहा बिंदीचा वापर केला जातो. ही बिंदी म्हणजे पिवळ्या रंगाचा ठिपका. उत्तम दर्जाच्या लाकडावर एक ठिपका म्हणजे एक बिंदी, तर ग्रेडिंगनुसार दोन बिंदी, तीन बिंदी, चार बिंदी, पाच बिंदी, सहा बिंदी चढविल्या जातात. म्हणजेच पिवळ्या रंगाच्या आॅइलपेंटचे ते ठिपके लाकडाच्या दर्शनी भागावर खिळ्यांच्या बाजूला लावले जातात.

परतवाडा डेपोतून २५ कोटींचा महसूल
खिळे आणि बिंदीनुसार लाकडाची शासकीय किंमत निर्धारित केली जाते. खिळे आणि बिंदीनुसार ग्रेड-लॉट लिस्ट बघून देशभरातील व्यापारी आॅनलाइन लिलावात आपआपल्या ठिकाणी बसूनच बोली करतात आणि आपल्या पसंतीचे लाकूड खरेदी करतात. त्यांच्या नजरा या खिळा आणि बिंदीवरच असतात.



सागवानला मागणी
मेळघाटातील सागवानाला आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, पंजाब, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगढ, कर्नाटकसह महाराष्ट्रात मोठी मागणी आहे. यासोबतच नागपूर (विदर्भ) मध्ये आरागिरणीवर कापून कटसाइज लाकूड देशभर पाठविले जाते. या सर्व राज्यांतील व्यापारी आॅनलाईन लिलाव पद्धतीत आपला सहभाग देतात.

Web Title: Nails and bindi that tell the identity of Teak wood in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.