अचलपूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर गुंडांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 10:47 AM2018-09-04T10:47:02+5:302018-09-04T11:14:07+5:30
अचलपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी शांतीलाल पटेल यांच्यावर मंगळवारी पहाटे शहरातील कुख्यात पाच ते सात गुंडांनी रॉड व सळईने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी अमरावती येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: अचलपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी शांतीलाल पटेल यांच्यावर मंगळवारी पहाटे शहरातील कुख्यात पाच ते सात गुंडांनी रॉड व सळईने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी अमरावती येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
सोमवारी रात्री पोलीस कर्तव्यावर असलेली अधिकारी शुभांगी ठाकरे यांनी या सात ते आठ आरोपींना दारू पिताना बघितले असता काहीजण तिथून पळाले, तर काहींना पोलिसी खाक्या दाखविला व काही वेळा नंतर सोडून देण्यात आले. या आरोपींनी आपल्याला मारहाण केल्याचा राग मनात धरून पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ठाकरे हिचा पाठलाग केला. पण त्या पहाटेपर्यंत या आरोपींना कुठेच गवसल्या नाहीत. त्याचवेळी पोलीस स्टेशनमधून घरी जात असलेल्या पोलीस कर्मचारी सहा. पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल चुणीलाल पटेल (५२) यांना अडवून रॉड व सलाखीने डोक्यावर वार केले. यामध्ये शांतीलाल पटेल गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच यातील तीन कुख्यात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अधिक आरोपींचा शोध घेतला जात आहे.
ग्रामीण रुग्णालयात अधिकाऱ्यांच्या भेटी,
अमरावती जिल्ह्या रुग्णालयात पोलिस उपअधीक्षक गृह शिरीष राठोड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सदानंद मानकर व किरण वानखडे यां अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे,
तीन महिन्यातील दुसरी घटना
या आधी चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनमधील सतीश मडावी या पोलीस कर्मचाऱ्यावर सुद्धा २७ मे ला अशाच प्रकारे हल्ला झाला होता. त्यामध्ये तो मृत्यू पावला होता. या घटनेला तीन महिने होत नाही तर ही दुसरी घटना जिल्ह्यामध्ये घडली आहे,