लालखडीत आढळला साडेचौदा फुटाचा अजगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 09:42 PM2017-10-14T21:42:32+5:302017-10-14T21:42:44+5:30
लालखडी परिसरात साडचौदा फुटाचा अजगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लालखडी परिसरात साडचौदा फुटाचा अजगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माहिती मिळताच जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेच्या सर्पमित्रांनी अजगराला पकडून मेळघाटच्या जंगलात सोडले आहे.
गुरुवारी सकाळी ७.३० वाजता इतवारा बाजार ते वलगाव मार्गावरील लालखडी सबस्टेशन परिसरात नागरिकांना अजगर आढळून आला. अजगराने एका बकरीला फस्त केल्याचे नागरिकांना दिसून आले होते. याबाबत सर्पमित्र शुभम गायकवाड यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन अजगराला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, अजगर हा साडेचौदा फुटांचा व पूर्ण वाढ झालेली असल्यामुळे त्याला पकडण्याचे सर्पमित्रासमोर आव्हान निर्माण झाले होते. त्यामुळे गायकवाड यांनी रत्नदीप वानखडे, सागर मैदानकर, विक्की गांवडे यांच्या मदतीने अजगराला पकडण्यात तासभराने यश मिळविले. अजगराने या परिसरातील अनेक पाळीव प्राण्यांना फस्त केल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे त्याला जंगलात सोडण्याचा निर्णय सर्पमित्रांनी घेतला. यासंदर्भात उपवनसरंक्षक हेमंत मीना यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या निर्देशानुसार सर्पमित्रांनी अजगराला वनकर्मचाºयांच्या स्वाधीन केले.
जखमी वन्यप्राण्यांची माहिती द्या
शहरात आढळलेल्या अनेक सापांना पकडून सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे. शहरात कुठेही जखमी वन्यप्राणी आढळल्यास नागरिक सर्पमित्र सागर मैदानकर यांच्याशी संपर्क करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.