जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा आढावा

By admin | Published: March 24, 2017 12:08 AM2017-03-24T00:08:11+5:302017-03-24T00:08:11+5:30

जलयुक्त शिवार योजनेतील विकासकामांचा आढावा आ. रवि राणा, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी घेतला.

Review of the activities of Jalakit Shivar Yojana | जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा आढावा

जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा आढावा

Next

अंजनगावबारीत पाणीपुरवठा : भातकुली, अमरावती तालुक्यातील तलावांचे खोलीकरण
अमरावती : जलयुक्त शिवार योजनेतील विकासकामांचा आढावा आ. रवि राणा, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी घेतला. यावेळी भातकुली, अमरावती तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अंजनगाव बारी येथे ८ कोटी रुपयांतून महत्त्वाकांक्षी पाणी पुरवठा प्रकल्पाचे आराखडे पाच दिवसांत तयार करण्याच्या सूचना संबंधिताना देण्यात आल्यात.
भातकुली, अमरावती तालुक्यात काही गावांमध्ये जलसंकट उद्भवल्याच्या पार्श्वभूमिवर आ. राणा यांच्या पुढाकाराने आढावा बैठक घेण्यात आली. ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेची कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी झालेल्या कामांची माहिती जाणून घेतली.
या आढावा बैठकीत संत गाडगेबाबा ऋणमोचन वर्ग ‘ब’ तीर्थस्थळासाठी २५, तीर्थक्षेत्र कोंडेश्वर वर्ग ‘ब’ साठी २५ कोटी तर तपोवनेश्वर तीर्थक्षेत्रासाठी ५ कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता प्रदान करण्यात आली. अमरावती व भातकुली तालुक्यातील तलाव खोलीकरण, लहान सिमेंट बंधारे आदी कामे करण्यासाठी ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करून तो शासनाकडे पाठविण्यात आला.
पाणी समस्येवर मात करण्यासाठी गावातील विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जलयुक्त शिवार योजनतून कोंडेश्वर तलावाचे खोलीकरण व बांधकामासाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. पाणी टंचाईवर मात करताना पशुंसाठी मुबलक चारा मिळावा, यासाठी चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. अंजनगाव बारी येथे जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धस्तरावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी दालनात पार पडलेल्या बैठकीला पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंता श्वेता बॅनर्जी, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कळमकर, उपअभियंता तलवारे, ढेरे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश टेकाम, रश्मी घुले, मीनल डकरे, मयुरी कावरे, जया तेलखडे, प्रदीप थोरात, राजेंद्र रोडगे, उमेश ढोणे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Review of the activities of Jalakit Shivar Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.