अखेर शकुंतला रेल्वे धावली!
By admin | Published: April 28, 2017 12:11 AM2017-04-28T00:11:29+5:302017-04-28T00:11:29+5:30
लेहगावनजीक भुलेश्वरी नदीवर असलेल्या पुलावरील लोहमार्गाच्या मधील लागली स्लिपर्सला अज्ञात व्यक्तीने आग लावली होती.
गरिबांचा रथ : लोहमार्गाचे काम पूर्ववत
दर्यापूर : लेहगावनजीक भुलेश्वरी नदीवर असलेल्या पुलावरील लोहमार्गाच्या मधील लागली स्लिपर्सला अज्ञात व्यक्तीने आग लावली होती. त्यामुळे हा मार्ग काही दिवस बंद ठेवण्यात आला होता. ही रेल्वे पुन्हा पूर्ववत गुरुवारपासून सूरू झाली आहे.
गरिबांचा रथ असलेली ब्रिटिशकालीन रेल्वे सुरू झाल्यामुळे शकुंतलेच्या प्रवाशांमध्ये आनंद संचारला आहे. ज्या अज्ञात व्यक्तीने पटरीवरील लाकडी स्लिपर्स जाळल्या त्याची रेल्वे पोलीस व दर्यापूर पोलीस चौकशी करीत आहे. मूर्तिजापूर ते अचलपूर असा ७६ किमी.चा प्रवास ही रेल्वे दोनदा करते. त्यामुळे या रेल्वेच्या प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ही रेल्वे ना नफा ना तोटा या तत्त्वावर धावत आहे. या रेल्वेचे अनेक किस्से घडतात. काही भागातील टिकीट घर व रेल्वे स्टेशनवर सुविधा बंद झाल्यामुळे मूर्तिजापूर लाखपुरी व अचलपूर येथेच प्रवाशांना टिकीट मिळते. नाहीतर रेल्वेतच टिकीटची सुविधा करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)