‘वॉटर कप’ स्पर्धेसाठी श्रमदान
By admin | Published: May 8, 2017 12:12 AM2017-05-08T00:12:12+5:302017-05-08T00:12:12+5:30
सुप्रसिद्ध सिनेअभिनेता आमीर खान यांनी प्रारंभ केलेल्या वॉटर कप स्पर्धेसाठी मेळघाटातील साद्राबाडी या गावात भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने ....
साद्राबाडी ग्रामस्थांचा पुढाकार : ग्रामसेवकांसह बीडीओंचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : सुप्रसिद्ध सिनेअभिनेता आमीर खान यांनी प्रारंभ केलेल्या वॉटर कप स्पर्धेसाठी मेळघाटातील साद्राबाडी या गावात भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने आयोजित ‘महाश्रमदान’मध्ये हजारो हातांनी हातात कुदळ, पावडे व घमेले घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथ्था, एसडीओ विजय राठोड, बीडीओ उमेश देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.
वॉटर कप स्पर्धेच्या अव्वल स्थानी येण्यासाठी धावपळ करणाऱ्या गावात साद्राबाडीचे नाव प्रामुख्याने घेतले जात असले तरी पाणी फाऊंडेशनने केलेल्या सर्वोत्कृष्ट कामाच्या यादीत घुटी ग्रामपंचायतचे नाव सर्वात वर आहे. साद्राबाडी ग्रा. पं. चे ग्रामसेवक राम कानेकर, श्रीराम पटेल, हिरालाल मावस्कर यांचेसह माजी आमदार राजकुमार पटेल व प्रकाश घाडगे यांचे महत्प्रयत्न सुरू आहे. यात कृषी विभागाचे मंडळ अधिकारी अरूण बेठेकर यांनी आपल्या विभागामार्फत यशस्वी नियोजन करण्यात पुढाकार घेतला आहे. आज रविवारी सकाळी भारतीय जैन संघटना वस्तीगृहातील माजी विद्यार्थी संघटनेने दिलेल्या हाकेवर हजारो ग्रामवासियांनी सहभाग घेत लंगडा बाबा मंदिराजवळील टेकडीवर चर खोदून इतिहास घडविला. अविश्वसनीय वाटणाऱ्या मोठे आवाहन अवघ्या तीन तासात सर करून मेळघाटवासियांनी पाण्यासाठी आपली भागीदारी नमूद करीत सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला.
आज झालेल्या महाश्रमदानात अधिकारी, नेते, गरीब व श्रीमंतांनी हातात कुदळ, पावडे व घमेले उचलून पाण्याचे महत्वात आपलाही सिंहाचा वाटा असल्याचे सिद्ध करून दिले.