राज्यस्तरीय शालेय मल्लखांब, नेटबॉल स्पर्धा अमरावतीत रंगणार, हजारो खेळाडू सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 05:21 PM2017-10-11T17:21:16+5:302017-10-11T17:21:27+5:30

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब व नेटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन अमरावती येथे शुक्रवारपासून करण्यात आले आहे.

State level school Mallakhamb, Netball competition will be played in Amravat, thousands of players participate | राज्यस्तरीय शालेय मल्लखांब, नेटबॉल स्पर्धा अमरावतीत रंगणार, हजारो खेळाडू सहभागी

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब, नेटबॉल स्पर्धा अमरावतीत रंगणार, हजारो खेळाडू सहभागी

Next

अमरावती : राज्यस्तरीय शालेय मल्लखांब व नेटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन अमरावती येथे शुक्रवारपासून करण्यात आले आहे. तीन दिवस चालणा-या या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे व नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या हस्ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात सकाळी ९ वाजता होईल.  
१२ ते १५ आॅक्टोबरदरम्यान आयोजित या स्पर्धेत राज्यातील सुमारे १ हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. मल्लखांबमध्ये १९२, तर नेटबॉलमध्ये ८१६ विद्यार्थी-विद्यार्थिनी खेळाडू सहभागी होतील. दोन्ही क्रीडा स्पर्धा १४, १७ व १९ वर्षे वयोगटात विभागण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत विजयी ठरणारे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली.
खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक यांची निवास व भोजनाची व्यवस्था श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळासह शहरातील विविध ठिकाणी करण्यात आली आहे. स्पर्धेचा समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रम १५ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता होईल. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर व क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख उपस्थित राहतील.  

स्पर्धेच्या आयोजनाच्या दृष्टीने आम्ही संपूर्ण तयारी केली आहे. बहुतांश खेळ बाहेर खेळविण्यात येतील मात्र, स्पर्धा कालावधीत पाऊस आल्यास सर्व स्पर्धा इनडोअर हॉलमध्ये घेण्यात येतील.
- गणेश जाधव,
जिल्हा क्रीडा अधिकारी, अमरावती

Web Title: State level school Mallakhamb, Netball competition will be played in Amravat, thousands of players participate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा