‘त्या’ दोन महिलांनी केले तीन लाखांचे दागिने परत

By admin | Published: April 2, 2015 12:26 AM2015-04-02T00:26:07+5:302015-04-02T00:26:07+5:30

सराफा बाजारात सापडलेल्या पर्समधील तीन लाखांचे दागिने दोन महिलांनी पोलिसांच्या स्वाधीन करुन प्रामाणिकपणाचा परिचय दिला.

The two women returned three lakh jewelery made by them | ‘त्या’ दोन महिलांनी केले तीन लाखांचे दागिने परत

‘त्या’ दोन महिलांनी केले तीन लाखांचे दागिने परत

Next

अमरावती: सराफा बाजारात सापडलेल्या पर्समधील तीन लाखांचे दागिने दोन महिलांनी पोलिसांच्या स्वाधीन करुन प्रामाणिकपणाचा परिचय दिला. या दोन महिलांचा राजापेठ पोलिसांनी बुधवारी सायंकाळी सत्कार केला.
स्थानिक अंबापेठ येथील रहिवासी प्रतिभा जंगले व सविता तानकर बुधवारी सराफा बाजारात दागिने खरेदीकरिता गेल्या होत्या. त्या सराफ्यातील एका हातगाडीवर फराळ करण्यासाठी गेल्यात. त्यावेळी सुनंदा ततंरपाळे व त्यांच्यासोबतची एक मुलगी फराळ करीत होती. फराळ आटोपून सुनंदा या निघून गेल्या. मात्र, त्यांची पर्स टेबलजवळ पडली. ही बाब प्रतिभा व सविता यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ राजापेठ पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक एस.एस. भगत यांना माहिती दिली. पोलिसांनी पर्सची पाहणी केली असता त्यामध्ये ११० ग्रॅमचे सोन्याचे दागिने आढळून आले. त्यांच्या प्रामाणिकपणाचे पोलिसांनी कौतूक करुन सुंनदा ततंरपाळे दागिने परत केले.

Web Title: The two women returned three lakh jewelery made by them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.