विद्यापीठात अभ्यागत, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:04 PM2018-07-29T23:04:23+5:302018-07-29T23:05:36+5:30

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात शैक्षणिक कामानिमित्त येणारे अभ्यागत, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्र सरकार, अनुदान आयोग, रूसाकडून कोट्यवधींचे अनुदान मिळत असताना विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह असू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

The university does not have a bathroom for visitors, students | विद्यापीठात अभ्यागत, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह नाही

विद्यापीठात अभ्यागत, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह नाही

Next
ठळक मुद्देमहिला, मुलींची कुचंबणा : बृहत आराखड्यात समस्येकडे सिनेट सदस्यांचे दुर्लक्ष
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात शैक्षणिक कामानिमित्त येणारे अभ्यागत, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्र सरकार, अनुदान आयोग, रूसाकडून कोट्यवधींचे अनुदान मिळत असताना विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह असू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विद्यापीठाचा विस्तार अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यापर्यंत विस्तारलेला आहे. सुमारे ३८३ महाविद्यालये आणि पाच लाखांच्या घरात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्तरदायित्वाची जबाबदारी विद्यापीठावर आहे. दरदिवशी शैक्षणिक कामानिमित्त अभ्यागत, विद्यार्थी बहुसंख्येने विद्यापीठात येतात. विशेषत: परीक्षा विभाग आणि प्रशासकीय इमारत परिसरात कामानिमित्त येणाऱ्यांची गर्दी ही नित्याचीच बाब आहे. मात्र, अभ्यागत आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने गैरसोय होत असल्याचे वास्तव आहे. विद्यापीठाने परिसरात अन्य विभागाच्या टोलेजंग इमारती साकारला असल्या तरी विद्यार्थी, अभ्यागतांचे अवागमन असलेल्या ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृह निर्माण केले नाही. विद्यापीठाने पुढील २० वर्षांच्या शैक्षणिक प्रगतीचे मार्ग शोधण्यासाठी बृहतआराखडा तयार केला आहे. या आरखड्याला मान्यता प्रदान करण्यासाठी २५ जुलै रोजी सिनेट सदस्यांची सभा घेतली. मात्र, अनेक वर्षांपासून परीक्षा विभाग आणि प्रशासकीय इमारत परिसरात अभ्यागतांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याची बाब एकाही सिनेट सदस्यांच्या लक्षात येऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. विद्यापीठाने अधिकारी, कर्मचाºयांसाठी स्वच्छतागृह निर्माण केले आहे. मात्र, ज्यांच्या हितासाठी विद्यापीठ झाले, त्यांनाच स्वच्छतागृह शोधण्याचा प्रसंग ओढवत असेल तर विद्यापीठ प्रशासनाचे कामकाज कसे सुरू आहे, हे स्पष्ट होते.

विद्यार्र्थींनीच्या हिताचा निर्णय कधी घेणार?
विद्यापीठात बहुसंख्येने महिला, मुली शैक्षणिक कामानिमित्त येतात. मात्र, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने त्यांची कुचंबणा होते. स्वच्छतागृहअभावी त्यांना अनेक गैरसोयीच्या सामोरे जावे लागत असल्याची कैफियत एका विद्यार्थीनीने ‘लोकमत’जवळ व्यक्त केली. परीक्षा विभाग परिसरात मुलींसाठी स्वंतत्रपणे स्वच्छतागृह निर्माण करणे ही काळाची गरज आहे. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने अनावश्यक इमारती साकारण्याचे काम हाती घेतल्याचे चित्र आहे.
कार पार्किंगचा बोजवारा
विद्यापीठात बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे चारचाकी वाहने आहे. मात्र, विद्यापीठात स्वतंत्रपणे कार पार्किं ग नसल्याने मर्जीनुसार कोणी, कोठेही कार पार्किं ग करतात. वाहन चालक सोयीच्या ठिकाणी कार पार्किं ग करीत असल्याने विद्यापीठ परिसराला अविस्कळीत वाहतुकीचे स्वरूप आले आहे. भावी पिढी म्हणजे विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या घडविण्याचे काम विद्यापीठ करीत असताना येथे नियमावली, शिस्तीला फाटा दिल्या जात असल्याने कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि कुलसचिवांचे प्रशासनावरील नियंत्रण तर सुटले नाही ना! असे म्हणण्याची वेळ आली आहे.

शैक्षणिक कामानिमित्त येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. यापूर्वी स्वच्छतागृह साकारले नसले तरी ही सकारात्मक सूचना आहे. याची त्वरेने अंमलबजावणी करून स्वच्छतागृह साकारले जाईल.
- अजय देशमुख
कुलसचिव, विद्यापीठ

विद्यापीठ हे विद्यार्थ्यांचे हित, प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी आहे. कुणाची मक्तेदारी नाही. विद्यार्थी, अभ्यगतांसाठी स्वच्छतागृह निर्माण केले नाही तर कुलगुरूंसह अन्य अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही.
- राहूल माटोडे,
उपाध्यक्ष, युवा सेना

Web Title: The university does not have a bathroom for visitors, students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.